Offensive religious post Dainik Gomantak
गोवा

Offensive religious post: आक्षेपार्ह धार्मिक पोस्ट, 'त्या' जुळ्या बहिणींना सशर्त जामीन मंजूर

हिंदूंविषयी अपमानास्पद धार्मिक पोस्ट केल्याप्रकरणी गोव्यातील जुळ्या बहिणींविरोधात गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे.

Pramod Yadav

हिंदूंविषयी अपमानास्पद धार्मिक पोस्ट केल्याप्रकरणी गोव्यातील जुळ्या बहिणींविरोधात गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. शाझिया आणि राबिया या जुळ्या बहिणींना पणजी प्रधान सत्र न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

संशयितांना तपासात सहकार्य करणे तसेच, तपास अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय गोव्याबाहेर न जाण्याची अट त्यांच्यावर घालण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये कुख्यात गुंड अतिक अहमद याच्या हत्तेनंतर दोघींनी हिंदूविरोधी पोस्ट इन्स्टाग्रामवर केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी एकाने ट्विट करून याबाबत माहिती दिली होती. याची तात्काळ दखल घेत गोवा पोलिसांनी दोघींच्या इन्स्टाग्राम खात्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने जुळ्या बहिणींना अटक केल्यास प्रत्येकी दहा हजार रूपयाची हमी आणि तितक्याच रकमेचा एक हमीदार व इतर अटीवर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. यात तपास अडथळ न आणणे तसेच, परवानगीशिवाय गोव्याबाहेर न जाणे अशा अटी आहेत.

दोघींनी उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेने समन्स बजावून त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. दोघींही चौकशीसाठी हजर राहिल्या होत्या.

जुळ्या बहिणींनी आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर त्यांच्याविरोधात सोशल मिडियावर लोकांना तीव्र हरकत घेतली होती. एका याप्रकरणाची दखल घ्यावी अशी विनंती गोवा पोलिसांनी केली, त्यांनतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT