Goa Bench Of Bombay High Court | Goa Panchayat Election Dainik Gomantak
गोवा

OBC Reservation : ओबीसी आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील निकाल राखीव

पंचायत निवडणुकीच्या ओबीसी आरक्षणाला आव्हान दिलेल्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडे आज दाखल करून घेतल्या आहेत. या याचिकांवरील अंतरिम निर्णय राखून ठेवण्यात आला आहे.

विलास महाडिक

पणजी : पंचायत निवडणुकीच्या ओबीसी आरक्षणाला आव्हान दिलेल्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडे आज दाखल करुन घेण्यात आल्या आहेत. कोर्टाने या सहा आव्हान याचिकांवरील अंतरिम निर्णय राखून ठेवला आहे. त्यामुळे गोवा पंचायत निवडणुकीत ओबीसी आरक्षणाचा संभ्रम कायम राहिला आहे.

गोवा खंडपीठात ओबीसी आरक्षणावर युक्तिवाद पूर्ण झाला असून कोर्टाने आपला निकाल राखून ठेवला आहे. लवकरच कोर्ट आपला निकाल देणार असून आज किंवा उद्या निकाल जाहीर होईल, असा अंदाज अॅडव्होकेट जनरल देवीदास पांगम यांनी व्यक्त केला आहे. राज्य सरकारकडून सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांचं पालन करत ट्रिपल टेस्टनंतरच आरक्षण जाहीर केल्याचं कोर्टासमोर मांडल्याचं पांगम यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान गोवा खंडपीठाने ओबीसी आरक्षणाविरोधात निर्णय दिल्यास ओबीसींना पुरेसा वेळ मिळणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. गोव्यात पंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरु झाली आहे. 25 जुलैपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असून कोर्टाने आरक्षणाविरोधात निर्णय दिल्यास त्याचा निवडणुकीच्या प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण कोर्टाला निवडणुकीच्या कार्यक्रमात हस्तक्षेप न करण्याची विनंती केली आहे, असंही अॅडव्होकेट जनरल देवीदास पांगम यांनी स्पष्ट केलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT