OBC Reservation | Goa Marathi News Dainik Gomantak
गोवा

..तर ओबीसी समाज उतरणार रस्‍त्‍यावर

ओबीसी आरक्षणाशिवाय पंचायत निवडणुका नकोच

दैनिक गोमन्तक

शिवोली: भारतीय संविधानामुळे इतर मागासवर्गीयांना प्राप्त झालेले आरक्षण शिरसावंद्य आहे. पण भाजप सरकारच्या चालढकल वृत्तीमुळे यंदाच्या पंचायत निवडणुकीत ही संधी गमावण्याची वेळ स्थानिक ओबीसी समाजावर आलेली आहे.

(OBC reservation demand to be announced before elections OBC community demand)

परंतु कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षण निवडणुकापुर्वी जाहीर करण्यात यावे, अन्यथा ओबीसी समाज पावसाळी अधिवेशन काळात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरेल, असा इशारा गोवा क्षत्रिय मराठा समाजाचे उपाध्यक्ष तथा ओशेल-शिवोलीचे माजी उपसरपंच मंगेश चोडणकर यांनी दिला आहे. (Goa Marathi News)

ओबीसी आरक्षणाची सोय कायद्यानुसार संमत झालेली असतानाही 2017 पासून राज्यातील भाजप सरकार या प्रश्नाकडे गांभीर्याने न पाहता केवळ वेळकाढू धोरण अवलंबित आहे. ओबीसी आरक्षणाखाली राज्यातील एकुण 19 जाती उद्धाराच्या प्रतीक्षेत आहेत. (OBC Reservation)

पंचायत निवडणुकांत सहभागी होण्याची मिळालेली प्रथमच संधी केवळ सरकारच्या नाकर्तेपणामुळे हुकत आहे, असा आरोपही चोडणकर यांनी केला. बहुसंख्येने असलेला इतर मागासवर्गीय समाज यामुळे दुखावला आहे. निवडणुकीपूर्वी ओबीसी आरक्षणाचा प्रश्न न सोडविल्यास अधिवेशन काळात रस्‍त्‍यावर उतरू, असा इशारा चोडणकर यांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT