Number of domestic and foreign tourists visiting Goa used to be 70-80 lakh but this year it has come down to 1 lakh Dainik Gomantak
गोवा

Covidमुळे गोवा पर्यटनाला मोठा फटका

देशी विदेशी पर्यटकांची संख्या ही 70-80 लाख असायची ती केवळ 1 लाखावर आली आहे.

Chetan Lakkaibailkar

पणजी: गोवा (Goa) हे केवळ देशी पर्यटकांंनाच नव्हे तर विदेशी पर्यटकांनाही (Tourism) आर्कर्षित करते. पर्यटक (Tourist) येती घरा, तोची दिवाळी-दसरा हा गोमंतकीयांचा मंत्र आहे. कारण, या व्‍यवसायातून (Business) राज्याला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. पण गेल्या दोन वर्षांत पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली. त्याला कारणीभूत ठरली ही कोरोना (Covid-19) ही महामारी. स्थानिक व्यवसायदेखील यामुळे धोक्यात आले. कधी काळी देशी विदेशी पर्यटकांची संख्या ही 70-80 लाख असायची ती केवळ 1 लाखावर आली आहे. यंदा तर काही हजारांवर आली. त्यामुळे पर्यटनाला मोठा फटका बसला.

अशी होती पर्यटकांची रेलचेल

"कोविड महामारीचा पर्यटनावर परिणाम झाला आहे. मात्र, आता राज्‍यातील अनेक क्षेत्र खुली करण्यात आली असल्याने पर्यटनाला वेग येईल. त्यामुळे राज्याच्या महसुलातही वाढ होईल. गोव्यातील पर्यटनाला वेगळे महत्व आहे. त्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात,त्यात अजून भर पडावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे."

- जे. अशोक कुमार, आयुक्त, पर्यटन विभाग

परदेशी पर्यटकांचे नऊ दिवस

राज्यात पर्यटनासाठी येणारे देशी पर्यटक किमान पाच दिवस गोव्‍यात राहतात, तर परदेशी पर्यटक 9 दिवस रेंगाळतात, असे एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे. दरवर्षी परदेशातून सुमारे 2 लाख 18 हजार विमान फेऱ्या होतात. राज्याला परदेशी पर्यटकांच्या माध्यमासून अधिकाधिक महसूल मिळत असतो. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोविड महामारीचा परिणाम पर्यटनावर झाला आहे.

जलसफरीसाठी गर्दी

पर्यटकांचे महत्त्वाचे आकर्षण हे बोट क्रुझ आणि कॅसिनो आहेत. संध्याकाळी ५ नंतर जुन्या सचिवालयासमोरील रस्त्यावर गर्दी होत असून अनेक ठिकाणी ट्राफिक जॅम होत असून पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. ही संख्‍या पुढील दिवसांत वाढण्‍याची शक्‍यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Umrah Pilgrims Accident: सौदी अरेबियात भीषण अपघात! मदिनाजवळ टँकरला धडकून बसला आग, 42 भारतीय यात्रेकरूंचा दुर्दैवी मृत्यू

Bihar Election Goa Impact: गोव्याच्या दृष्टीनेही 'बिहार' निकालाचा विचार करणे गरजेचे..

Mhadei Land: 'गोवा मुक्तीच्या आधीपासून लोक इथे राहताहेत'; घर, उत्पन्नाची जागा सोडून अभयारण्य निश्चित करा; म्हादईतील भूमिपुत्रांची मागणी

'यापुढे पारंपरिक सहकारी संस्थांना परवानगी देण्यात येणार नाही'! CM सावंतांचे प्रतिपादन; कर्ज बुडव्‍यांचे प्रमाण वाढल्याचा दावा

Goa Crime: भररात्री क्राईम ब्रांचची धडक कारवाई! म्हापसा हॉटेलमधून 2 अल्पवयीन मुलींची सुटका, मानवी तस्करांना अटक

SCROLL FOR NEXT