Goa Corona Update Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: राज्यात कोरोना रूग्णसंख्येत वाढ; गेल्या 24 तासात आढळून आले 'इतके' रूग्ण

राज्यातील सक्रीय कोरोना रूग्णसंख्या 26 वर

Akshay Nirmale

Goa Corona Update: जगभरात कोरोनाच्या रूग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. कोरोनाचा बीएफ-7 हा व्हेरियंट सध्या जगभरात धुमाकूळ घालत आहे. गोव्यातही गेल्या 24 तासात कोरोनाचे तब्बल 9 नवे रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील उपचार सुरू असलेल्या सक्रीय कोरोनारूग्णांची संख्या आता 26 वर गेली आहे.

गोव्यात गेल्या 24 तासात 609 चाचण्या झाल्या आहेत. तर कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. गोव्यातील सक्रीय कोरोना रूग्णसंख्या म्हणजेच उपचार सुरू असलेल्या कोरोना रूग्णांची संख्या 26 झाली आहे. दरम्यान, गोव्याचा कोरोनामुक्ती दर 98.44 टक्के इतका आहे. सध्या गोव्यात 9 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

गोव्यात आत्तापर्यंत 21 लाख 24 हजार 181 एकुण चाचण्या झाल्या आहेत. एकुण 25 हजार 90 हजार 079 रूग्ण आढळून आले होते, 2 लाख 55 हजार 040 कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत 4013 कोरोनारूग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी BF.7 व्हेरियंटच्या पार्श्वभुमीवर तसेच ख्रिसमस आणि नूतन वर्षानिमित्त गोव्यता होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभुमीवर बैठक घेत सतर्कतेच्या सूचना दिल्या होत्या. याशिवाय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गोवा सरकारला ऑक्सिजन प्लांट सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT