corona  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात सर्व व्यवहार पूर्ववत सुरु करा, तज्ज्ञ समितीची शिफारस

तज्ज्ञ समितीची शिफारस: कोरोनाची तिसरी लाट ओसरली, लसीकरणही 100 टक्के

दैनिक गोमन्तक

पणजी: कोरोनाच्या ओमिक्रॉन संसर्गाची तिसरी लाट ओसरत असून पॉझिटिव्हिटी रेट दोन टक्क्यांच्या खाली आला आहे. तर नव्याने उपचारासाठी भरती होणाऱ्यांची संख्याही आता थांबली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व व्यवहार शंभर टक्के क्षमतेने सुरू करावेत अशी शिफारस कोरोना संबंधीच्या तज्ज्ञ कमिटी राज्य सरकारला केली आहे. आता कृती दल आणि राज्य सरकारने यावर निर्णय घेणे अपेक्षित आहे.

आज सोमवारी कोरोना संबंधीच्या तज्ज्ञ समितीची बैठक पणजीत झाली. गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाची डीन डॉ.शिवानंद बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला डॉ. शेखर साळकर, डॉ. शिवानंद गवस, डॉ.धनेश वळवईकर, डॉ.संतोष उसगावकर, डॉ.प्रभुदेसाई, डॉ.विनायक बुवाजी, डॉ.विराज खांडेपारकर, डॉ. राताबोली, डॉ.सागर, डॉ.कांबळी, डॉ.उत्कर्ष बेतोडकर यांच्यासह तज्ज्ञ कमिटीचे सतरा डॉक्टर उपस्थित होते.

राज्यातील कोरोनाची तिसरी लाट आता ओसरत आहे. लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्याची संख्या शंभर टक्क्यांच्या वर गेलेली आहे. पॉझिटिव्हिटी रेट दोन टक्क्यांच्या खाली आला आहे. त्यामुळे राज्यातले सर्व व्यवहार व्यवहार शंभर टक्के क्षमतेने सुरू करावेत असे तज्ञ कमिटीला वाटते. सर्व आस्थापनातील व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास हरकत नाही. राज्यातील पंधरा वर्षावरील लोकसंख्या लसीकरणयुक्त आहे. याशिवाय बूस्टर डोस घेण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे घसरलेली अर्थव्यवस्था रुळावर येण्यास मदत होईल असे तज्ज्ञ कमिटीचे मत आहे.

गेल्या 24 तासात कोरोनाचा बळी नसून उपचारासाठीही कोणाला दवाखान्यात भरती केलेले नाही. कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 1.79 टक्के इतका खाली आला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 271 इतकी आहे. तर गेल्या चोवीस तासात नवे 18 बाधित रुग्ण सापडले आहेत.

कोरोनाच्या कोणत्या व्हेरियन्टमुळे राज्यातील लोकांचा मृत्यू झाला याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. जर 80 टक्के बाधित ओमायक्रोनचे होते तर इतर 20 टक्यांचे काय ? याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. पंधरवड्यात जीनोम स्कीव्हेलिंगची मशीन दाखल होईल. त्याआधारे कोरोनाच्या व्हेरियन्टचे तपास लागेल. त्यासाठी संपूर्ण डाटा संरक्षित करणे गरजेचे आहे. - डॉ. शेखर साळकर, सदस्य, कृतीदल आणि तज्ञ कमिटी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सुनेत्रा पवारांनी घेतली पद अन् गोपनीयतेची शपथ, महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला 'उपमुख्यमंत्री'; PM मोदींकडून शुभेच्छा VIDEO

Operation Herof2: बलुचिस्तानमध्ये क्वेटासह 10 शहरांवर बलोच बंडखोरांचा ताबा, पाकिस्तानी सैनिक चौक्या सोडून पळाले; 10 ठार VIDEO

Pakistan Economy Crisis: "मुनीर अन् मी पैसे मागतो तेव्हा..." शहबाज शरीफ यांनी मांडली आर्थिक गुलामगिरीची व्यथा; परकीय कर्जाच्या अटींपुढे झुकला पाकड्यांचा कणा

Congo Landslide: 'कांगो'मध्ये निसर्गाचा महाप्रलय! मुसळधार पावसानं डोंगराचा कडा कोसळून 200 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये मुलांचाही समावेश VIDEO

Goa Elections 2027: प्लॅनिंग तयार, आता मैदानात उतरा! भाजप अध्यक्षांनी कार्यकर्त्यांना दिला 2027 च्या विजयाचा 'महामंत्र'; विधासभा निवडणुकीचं फुंकलं रणशिंग

SCROLL FOR NEXT