'NASA'ची 50 वर्षांनंतर चांद्रवारी, सहा मार्चला चार अंतराळवीरांसह यानाचे प्रक्षेपण; अशी असेल मोहीम

NASA Artemis 2 Moon mission: नासा’ने तब्बल ५० वर्षांनंतर मानवी चांद्रमोहीम आखली असून, सहा मार्च रोजी ‘आर्टेमिस २’ हे यान दहा दिवसांच्या चांद्रप्रवासासाठी उड्डाण घेणार आहे.
NASA Artemis 2 Moon mission
NASA Artemis 2 Moon missionDainik Gomantak
Published on
Updated on

नासा’ने तब्बल ५० वर्षांनंतर मानवी चांद्रमोहीम आखली असून, सहा मार्च रोजी ‘आर्टेमिस २’ हे यान दहा दिवसांच्या चांद्रप्रवासासाठी उड्डाण घेणार आहे. यामध्ये चार अंतराळवीर असतील आणि ते चंद्राच्या कक्षेत फिरून पुन्हा पृथ्वीवर परतणार आहेत.

शीतयुद्धाच्या काळामध्ये अमेरिका आणि सोव्हिएत महासंघ यांच्यामध्ये चांद्र मोहिमांसाठी मोठी स्पर्धा लागली होती. मात्र, १९७२ मध्ये ‘अपोलो १७’ मोहिमेमध्ये अखेरची चंद्रावरील मानवी मोहीम होती. आता पुन्हा चांद्रमोहिमेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

NASA Artemis 2 Moon mission
Electricity Bills Goa: वीज बिले चक्क 50 हजार ते लाखापर्यंत..! Video

यात फेब्रुवारीमध्ये पहिली रंगीत तालीम करण्यात आली होती, त्यामध्ये इंधनरुपी हायड्रोजनची गळती झाली होती. मात्र, त्यातील सर्व त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. आता पूर्ण क्षमतेने इंधन भरण्यात यश आले आहे, असे ‘नासा’च्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या मोहिमेमध्ये तीन अमेरिकी आणि एक कॅनडाचा अंतराळवीर सहभागी होणार आहे. त्यांना शुक्रवारपासून विलगीकरणात पाठविण्यात येईल.

२०२८मध्ये चंद्रावर मानव

ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर ‘आर्टेमिस ३’ मोहिमेसाठी तयारीला सुरुवात होईल. या मोहिमेमध्ये अंतराळवीर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. ही मोहीम २०२८मध्ये असेल, असे ‘नासा’कडून सांगण्यात आले.

‘आर्टेमिस ३’च्या बांधणीचे काम एलॉन मस्क यांच्या ‘स्पेसएक्स स्टारशिप’ कंपनीला मिळाले आहे. मात्र, त्यांच्याकडून बांधणीला विलंब होत असल्यामुळे, वेग वाढविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मस्क यांनी स्पर्धक कंपनी ‘ब्लू ओरिजिन’ला या कामात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

अशी असेल मोहीम

या मोहिमेमध्ये छोट्या बसच्या आकाराचे ‘ओरिऑन’ ही कुपी असून, त्यात चारही अंतराळवीर असतील.

उड्डाणानंतर पहिल्या दिवशी यान पृथ्वीच्या कक्षेत असेल. यामध्ये यानाच्या सर्व यंत्रणा व्यवस्थित काम करत असल्याचे तपासल्यानंतर ते चंद्राच्या दिशेने मार्गस्थ होईल.

पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या कक्षेपर्यंतचा प्रवास चार दिवसांचा.

चंद्राच्या पृथ्वीवरून न दिसणाऱ्या भागात हे यान जाईल.

चंद्राच्या पृष्ठभागापासून ६५०० ते ९५०० किलोमीटर अंतरावरून निरीक्षणे करण्यात येतील. तसेच, छायाचित्रे काढण्यात येतील.

निरीक्षणे पूर्ण झाल्यानंतर परतीचा प्रवास सुरू होईल आणि चार दिवसांमध्ये हे यान पॅसिफिक महासागरामध्ये उतरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com