New Zuari Bridge Dainik Gomantak
गोवा

New Zuari Bridge: नवीन झुआरी पुलावर आता नो सेल्फी! नागरिकांसाठी पुल उद्या राहणार बंद

29 डिसेंबरला पुलाचे होणार लोकार्पण

Akshay Nirmale

New Zuari Bridge: उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा यांना जोडणाऱ्या नवीन झुआरी पुलाचे लोकार्पण 29 डिसेंबरला होणार आहे. या पुलाचे स्थापत्य, सौंदर्य सर्वसामान्यांना अनुभवता यावे आणि पुलावरून नदीदेखील न्याहाळता यावी यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हा पुल चार दिवसांसाठी रात्रीच्या वेळी सर्वसामान्यांना खुला केला होता. लोकांना पुल पाहावा, सेल्फी घ्यावा... असेही मुख्यमंत्री म्हटले होते. पण आता उद्या 28 डिसेंबर रोजी मात्र सर्वसामान्यांना ही संधी मिळणार नाही.

न्यू झुआरी पुल हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा केबलस्टेड पुल आहे. याची केवळ नंदीवरील लांबी 8.2 किलोमीटर इतकी आहे. हा पुल पाहायला हजारो गोमंतकीयांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीमुळे आणि लोकांच्या सेल्फीच्या आवडीमुळेच मंगळवारी पणजी, मडगाव परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी झाल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्य सरकारवर केला होता.

या पुर्वी पुलाच्या लोकार्पणाची तारीख बदलण्यात आली होती. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करण्यात येणार आहे आणि गडकरी यांच्या वेळेसाठी पुलाच्या उद्घाटनाच्या तारखेत आणि वेळेत बदल करण्यात आला. 29 डिसेंबर रोजी होणार आहे.

त्यामुळे उद्घाटनासाठीची तयारी करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने आता उद्या 28 डिसेंबर रोजी हा पुल सर्वसामान्य गोमंतकीयांसाठी बंद केला आहे. त्यामुळे गोमंतकीयांना या पुलावर आता सेल्फीचा आनंद घेता येणार नाही. तथापि, लोकांनी उद्घाटन समारंभाला उपस्थित राहावे, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT