Arrest Dainik Gomantak
गोवा

Goa News: आता बीचवर भटकणारे भिकारी, अवैध मसाज देणाऱ्यांना होणार अटक; क्लीन, ग्रीन गोवासाठी सरकारने उचलले पाऊल

Goa News: परराज्यातून स्टोव्ह, शेगडी आणि सिलिंडर घेऊन येणाऱ्या पर्यटकांच्या या वस्तू जप्त करण्यात येणार.

Pramod Yadav

पणजी: स्वच्छ आणि ग्रीन गोव्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मोठी घोषणा केली आहे. समुद्रकिनाऱ्यांवर भटकणाऱ्या भिकाऱ्यांना तसेच अवैध मसाजसेवा देणाऱ्या अटक करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली. मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री सावंत बोलत होते.

मुंबईतील पुष्पम ज्वेलर्सकडून सीएसआर फंडातून गोव्यातील ३१ पोलिस स्थानकांना उच्च दर्जाचे लॅपटॉपचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री सावंत बोलत होते. गोवा क्लीन आणि ग्रीन ठेवण्यासाठी कडक नियम पाळणे गरजेचे आहे. त्यामुळे यापुढे समुद्रकिनाऱ्यांवर अवैध मसाज देणारे, भिकारी किंवा अवैध पद्धतीने वस्तू विक्री करणाऱ्यांना अटक केली जाईल, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले. टाउट्सना देखील अटक केली जाणार असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.

स्टोव्ह, शेगडी आणि सिलिंडर होणार जप्त

परराज्यातून स्टोव्ह, शेगडी आणि सिलिंडर घेऊन येणाऱ्या पर्यटकांच्या या वस्तू जप्त करण्यात येतील, असा इशारा देखील मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिला आहे. त्यामुळे यापुढे गोव्यात येणाऱ्या पर्यटकांनी स्टोव्ह, शेगडी आणि सिलिंडर घेऊन येताना विचार करावा, असे आवाहन सावंत यांनी केले आहे. परराज्यातून येणारे पर्यटक रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणावर कचरा करतात त्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी वक्फ सुधारणा विधेयकाचे स्वागत केले. गोव्यात वक्फ बोर्ड किंवा अशा पद्धतीची कोणतीही मालमत्ता नाही. तसेच, वक्फ सुधारणा विधेयकाचे गोव्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असे मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले. गोव्यातील सर्व धर्मातील लोक गुण्यागोविंदाने राहत असल्याचे सांवत यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Smriti Mandhana Record: विराट-रोहितला जमलं नाही ते स्मृती मानधना करणार! टी-20 क्रिकेटमध्ये विश्वविक्रम रचण्याची संधी, फक्त इतक्या धावांची गरज

Gram Panchayat CCTV Plan: गोव्यातील प्रत्येक पंचायतीवर सीसीटीव्हीची नजर! तीन आठवड्यांत प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता

Karnataka Accident: कर्नाटकात प्रवाशांवर काळाचा घाला! बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक; 4 ठार, 14 जखमी

Land Compensation: जमीन मोबदल्यासाठी 7 वर्षांची प्रतीक्षा! 15 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या; गोवा खंडपीठाचे निर्देश

World Peace University: तंत्रज्ञानाने जग जवळ आले, पण मने दूरच! विश्वशांतीसाठी राज्यपालांचे महत्त्वाचे आवाहन; 'डब्ल्यूपीयू'च्या परिषदेचे थिवीत उद्‌घाटन

SCROLL FOR NEXT