
पणजी: भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि चित्रपट निर्माते मनोज कुमार यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. यकृत संबधित आजारावर उपचार सुरु असताना मुंबईत शुक्रवारी (०४ एप्रिल) पहाटे चार वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देशभक्तीपर भूमिकांमुळे भारत कुमार अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती. दिग्गज मनोज कुमार यांनी तब्बल ४० वर्षे भारतातील सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली नव्हती.
दरवर्षी गोव्यात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित केला जातो. २०१३ साली आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवात अभिनेता मनोज कुमार यांनी हजेरी लावली होती. मनोज कुमार यांनी भारतीय पॅनारोमा विभागाचे उद्घाटन केले होते. तब्बल ४० वर्षानंतर मनोज कुमार या महोत्सवात हजर राहिले होते. महोत्सवात कुमार यांच्या प्रसिद्ध चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात आले आहे.
२०१३ सालच्या इफ्फीत उपकार (१९६७), वो कौन थी (१९६४) आणि रोटी कपडा और मकान (१९७४) या चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात आले होते. मनोज कुमार यांनी पाच दिवस महोत्सवात हजेरी लावत आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय चित्रपटांचा आस्वाद घेतला. ७० च्या दशकात मी महोत्सवाला उपस्थित राहण्याचे सोडले. 'मला येथील वातावरण अनुकल वाटतं नाही', असे मनोज कुमार यांनी म्हटले होते.
अभिनेते मनोज कुमार यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी मुंबईत निधन झाले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे. मनोज कुमार यांच्या नावावर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि सात फिल्मफेअर आहेत. सिनेमातील योगदानासाठी १९९२ साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला होता. तसेच, २०१५ साली त्यांना मानाचा दादसाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.