Notorious Thief Kasim Fayaz Gold Theft Case Solved
मडगाव: अट्टल चोरटा कासीम फय्याजकडून आणखी एका चोरीच्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. त्याने चोरलेले पाच लाखांचे सुवर्णालंकार कोलवा पोलिसांनी कर्नाटकातील उडुपी येथून हस्तगत केले आहेत.
कासीमने ही चोरीही वार्का येथील क्लब महिंद्रा रिसॉर्ट येथे केली होती. मागच्या वर्षी 29 डिसेंबर रोजी त्याने क्लब महिंद्रा रिसॉर्टमध्ये उतरलेल्या निवेदिथा शंकर या पर्यटकाचे पाच लाखांचे सोन्याचे दागिने त्याने लंपास केले होते. याप्रकरणी कोलवा पोलिस ठाण्यात तक्रारही नोंदवण्यात होती.
कासीम हा सराईत चोरटा असून तारांकित हॉटेलमध्ये उतरलेल्या पर्यटकांना (Tourists) तो सावज बनवतो. त्यांचे मौल्यवान वस्तू चोरुन नंतर त्यातून मिळालेली रोकड तो कॅसिनोमध्ये उधळतो. झटपट श्रीमंत होण्यासाठी त्याने हा चोरीचा मार्ग अवलंबला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.