arrested Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: गोव्यात 10 लाखांच्या दागिन्यांची चोरी, महाराष्ट्रात अनेक घरफोड्या; CCTV मुळे अट्टल चोरटा अटकेत

Merces criminal arrest: मेरशी परिसरात २८ ऑगस्ट रोजी झालेल्या दागिने चोरी प्रकरणाचा उलगडा करत जुने गोवा पोलिसांनी सराईत चोरट्याला गजाआड केले आहे. दुचाकी देखील जप्त केली आहे.

Sameer Panditrao

पणजी: मेरशी परिसरात २८ ऑगस्ट रोजी झालेल्या दागिने चोरी प्रकरणाचा उलगडा करत जुने गोवा पोलिसांनी सराईत चोरट्याला गजाआड केले आहे.

उत्तर गोवा पोलिस अधीक्षक यांच्या पथकाने जुने गोवा पोलिसांची मदत घेत कारवाई करत अनंत उर्फ अक्षय म्हाडेश्वर (कुडाळ, महाराष्ट्र) याला अटक केले आहे. दरम्यान, पोलिसांनी त्‍याने वापरलेली एन-टॉर्क दुचाकी (क्र. एमएच-०७-एएल-७५४१) देखील जप्त केली आहे.

पूजा राजेंद्र माणगावकर (वय ५६, गृहिणी, कुमार रेसिडेन्सी, मेरशी) यांनी ३ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, २८ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ४ ते २९ ऑगस्ट पहाटे २.१५ वाजेपर्यंत अज्ञात आरोपींनी त्यांच्या घराच्या खिडकीतून प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.

चोरट्यांनी ३० ग्रॅम सोन्याचे नाणे, ४० ग्रॅमचे मंगळसूत्र, दोन जोड बांगड्या, कानातले, नथ, सोन्याची अंगठी व चांदीचे पैंजण अशा एकूण सुमारे १० लाख किमतीच्या दागिन्यांची चोरी केली होती.

या संबंधी तक्रार दाखल होताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये काळ्या-लाल रंगाच्या एन-टॉर्कवर संशयित फिरताना दिसून आला. त्यानंतर पोलिस पथकाने संशयिताचा शोध घेत मेरशी येथे पाठलाग करून त्याला पकडले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देखील दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

संशयित आरोपी करतो मजुराचे काम

संशयित आरोपी अनंत म्हाडेश्वर हा मजूर असून, त्याने फ्लॅटमध्ये शिरून खिडकी उघडून दागिने चोरल्याची कबुली दिली आहे.

इंटरऑपरेबल क्रिमिनल जस्टीस सिस्टीम या तपासात संशयित आरोपीवर यापूर्वी महाराष्ट्र व गोवा येथे एकापेक्षा जास्त घरफोडी व चोरीचे गुन्हे नोंद असल्याचे उघड झाले आहे.

कुडाळ पोलिस ठाण्यात २०२३ साली दाखल झालेले किमान चार गुन्हे त्याच्या नावावर आहेत. काही प्रकरणात त्याला दोषीही ठरवण्यात आले आहे. आरोपी व्यावसायिक पद्धतीने चोरी करणारा गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

रहिवाशांनो, सीसीटीव्‍ही बसवा

१.अलिकडच्‍या काळात राज्‍यात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. परंतु सीसीटीव्‍ही असल्‍यास चोरीचा छडा लावणे सोपे पडते. त्‍यासाठी रहिवाशांनी अधिकाधिक सीसीटीव्‍हीचा अवलंब करावा, असे आवाहन पोलिस करत आहेत.

२.सीसीटीव्ही फुटेज हे न्यायालयात ग्राह्य धरले जाणारे महत्त्वाचे पुरावे ठरतात. प्रत्यक्ष साक्षीदार नसतानाही व्हिडिओ रेकॉर्डिंग गुन्हा घडल्याचे सिद्ध करते.

३.संशयित व्यक्तींची हालचाल, चेहऱ्याचे भाव, कपडे किंवा वाहनाची माहिती यातून सहज मिळते. कोणत्या वेळी, कुठे, कसा प्रकार घडला याचे अचूक चित्र सीसीटीव्हीमुळे पोलिसांना मिळते.

४.प्रत्यक्ष चौकशी व साक्षांवर अवलंबून न राहता पोलिसांना तत्काळ दिशा मिळते. सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही असल्यामुळे संभाव्य गुन्हेगारांवर मानसिक दबाव निर्माण होतो आणि गुन्हेगारी कमी होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सायंकाळपर्यंत टाळा उघडा! हायकोर्टाच्या जुन्या इमारतीला टाळा ठोकल्याप्रकरणी, 'हा खूप गंभीर प्रकार आहे', म्हणत कोर्टाने गोवा सरकारला झापलं

Goa Pollution: समुद्र प्लॅस्टिकने भरला, नद्या सांडपाण्याच्या विळख्यात! मार्टिन्स करो, प्रदूषणाचा विळखा सुटो..

Ganesh Idol: आजी-आजोबा 'हो' म्हणाले, छोट्या अस्मीने स्वतःच बनवली 'गणेशमूर्ती'; पारंपरिक मातीच्या मूर्तींची जागरूकता

Goa Live News: करूळ घाटात दरड कोसळली, गोवा -कोकणाकडे जाणारी वाहतूक ठप्प

Gold price in India: नवा उच्चांक! सोन्याचे भाव भिडले गगनाला, चांदीही तेजीत; ताजे दर जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT