Usgao Theft: दार तोडले, महिलेच्या तोंडात कोंबला बोळा! पालवाडा-उसगावात चोरांचा धुमाकूळ; 4 लाखांचा ऐवज लंपास

Palvada Usgao theft: पालवाडा-उसगाव येथील एका घरात चोरांनी रोख रकमेसह सुमारे चार लाखांचा ऐवज पळवला. ही चोरी रात्री चारच्या सुमारास घडली असून एका महिलेच्या मंगळसूत्रासह दावल चोरांनी पळविले.
Theft News
Goa TheftDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: पालवाडा-उसगाव येथील एका घरात चोरांनी रोख रकमेसह सुमारे चार लाखांचा ऐवज पळवला. ही चोरी रात्री चारच्या सुमारास घडली असून एका महिलेच्या मंगळसूत्रासह दावल चोरांनी पळविले. घरात एकटीच महिला असल्याचे कळताच चोरांनी घर गाठले. चोर घरात शिरल्याचे कळताच महिलेने प्रतिकार केला. मात्र, तिच्या तोंडात बोळा कोंबत चोरांनी रोख रकमेसह दागिने पळविले.

पालवाडा येथील रामा गावडे याच्या घरात ही चोरीची घटना घडली. गावडे कुटुंबीयांचा मासे विक्रीचा व्यवसाय असून रात्री तीनच्या सुमारास मडगावला जाऊन मासे आणले जातात. या व्यवसायावरच या कुटुंबाचा चरितार्थ चालतो. सकाळी तीनच्या सुमारास रामा हे मासे आणण्यासाठी मडगावला गेले होते. इतर घरांपासून काहीशा अंतरावर हे घर आहे.

घरात चार सदस्य राहतात. मात्र, दोघे इतरत्र गेल्यामुळे रामा याने पत्नी एकटीच होती म्हणून पुढील दरवाजाला कुलूप लावले आणि बाहेर पडला. घरात एकटीच असल्याने शीतल गावडे आपल्या खोलीला कडी लावून झोपली होती. त्याचवेळी दोन चोर मागील दरवाजाची कडी तोडून घरात शिरले. रात्री चारच्या सुमारास आवाज आल्याने शीतलने आपल्या खोलीचा दरवाजा उघडून बाहेर पाहिले तर दोन चोर तिला दिसले.

Theft News
Thivim Theft: 2 दुकाने फोडली, पोस्ट ऑफिसमधली तिजोरी पळवण्याचा प्रयत्न; थिवी परिसरात चोरट्यांची दहशत

तिने घाबरून दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही चोरांनी जोर लावून दरवाजा उघडला आणि शीतलच्या तोंडात बोळा कोंबला. तिच्या मानेला आवळून धरल्यामुळे घाबरलेली शीतल निपचित पडली. त्यानंतर चोरांनी तिच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि दावल घेऊन पळ काढला. पळण्यापूर्वी त्यांनी घरातील कपाट फोडून आतील साठ हजार रुपयांची रोकडही पळवली. सावध झाल्यावर शीतलने रामा -याला फोन लावून याची माहिती दिली.

Theft News
Goa Theft: सावधान! गोव्यात चोरट्यांचा धुमाकूळ, बंद घरे होताहेत 'टार्गेट'; म्हापसा, कोलवा परिसरात दहशत

१७ मार्चला झालेली चोरी पकडली!

पालवाडा येथे याच भागात गेल्या १७ मार्चला दोन घरांमध्ये चोरी झाली होती. ही चोरी फोंडा पोलिसांनी उघडकीस आणली होती. त्यावेळी चोरांनी घरातील दागिने पळवले होते. मात्र, फोंडा पोलिसांनी तपासाला वेग देताना २९ जुलैला चोरांना हुबळी (कर्नाटक) येथून जेरबंद करत सोन्याचे दागिने हस्तगत केले होते. आता पुन्हा याच भागात चोरी झाल्यामुळे पोलिस त्यादृष्टीने तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com