Link Road Dainik Gomantak
गोवा

मोपा लिंक रस्ताप्रकरणी पीडब्ल्यूडीला नोटीस

पर्यावरण आघात मूल्यांकन प्राधिकरणकडून आठवड्याची मुदत

दैनिक गोमन्तक

पणजी: मोपा विमानतळासाठी सध्या सुरू असलेल्या मोपा लिंक रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे. या प्रकरणाची दखल घेत रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने पर्यावरण परवाना घेतला असल्यास त्याची माहिती द्या व तो घ्यायचा गरज नसल्यास त्याचे स्पष्टीकरण देण्यासंदर्भातची नोटीस राज्य पर्यावरण आघात मूल्यांकन प्राधिकरणाचे संचालक दशरथ रेडकर यांनी बजावली आहे. या नोटिशीला उत्तर देण्यास एका आठवड्याची मुदत दिली आहे.

सध्या ज्या जमिनीतून विमानतळासाठी मोपा लिंक रस्त्याचे काम सुरू आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचे नुकसान झाले आहे तसेच वन्यजीव जनावरांचे नैसर्गिक स्रोतांचे नुकसान तसेच विविध प्रजातींचा विनाश झाला आहे. या कामावेळी मोठ्या प्रमाणात पर्यावरणावर आघात झाला असल्याची तक्रार मोपा विमानतळ पीडित शेतकरी संघर्ष समितीने दाखल केली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकामाने या नोटिशीला उत्तर द्यावे. या कामासाठी परवाना घेतला आहे का व घेण्याची आवश्‍यकता नसल्यास त्यासंदर्भातची माहिती द्यावी असे या नोटिशीत नमूद करणअयात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून मोपा लिंक रस्त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे होणारे नुकसान यामुळे आंदोलन सुरू झाले आहे. पोलिस संरक्षणात या रस्त्याचे काम सुरू आहे. नागझर - वारखंड पंचायतीने हे काम बंद करण्याची नोटीस बजावूनही ते करण्यात आले नाही. या कामासाठी केंद्रीय कायद्यांद्वारे सर्व ते सोपस्कार करण्यात आले असल्याचे स्पष्टीकरण उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला देऊन बोळवण केली.

त्यानंतर पंचायत संचालकांनी पंचायतीच्या काम बंद नोटिशीलाच स्थगिती दिली आहे. त्यामुळे या मोपा लिंक रस्त्याचे काम कोणत्याही अडथळ्याविना सुरळीत सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. अर्धवट आलेल्या शेतपिकाचे या रस्त्यासाठी नुकसान केल्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. सध्याचा मोपा लिंक रस्त्याऐवजी पर्यायी रस्ता करावा जेणेकरून कमी प्रमाणात पर्यावरणाचा तसेच झाडांची कत्तल होईल अशी विनंती करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

पर्यावरण परवान्याचे उल्लंघन केल्याचा दावा

मोपा परिसरातील ग्रामस्थांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ही याचिका येत्या 25 मार्चला अंतिम सुनावणीसाठी खंडपीठासमोर ठेवण्यात आली आहे. विमानतळासाठी आराखड्यात मोपा लिंक रस्ता ज्या जमिनीतून जाणार होता त्यात बदल करून सध्या सुरू असलेल्या जमिनीतून नेला जात आहे. पर्यावरण परवान्याचे उल्लंघन करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT