Vijai Sardesai Dainik Gomatak
गोवा

Vijai Sardesai: ‘प्रशासन नव्हे’ तर खंडणीखोर तुमच्या दारी- विजय सरदेसाई

तक्रार नाहीत म्हणून पोलिस खंडणी प्रकरणाचा तपास करण्यात तयार नाहीत.

गोमन्तक डिजिटल टीम

Vijai Sardesai: राज्य सरकारने प्रशासन तुमच्या दारी म्हणून उपक्रम राबविला. या उपक्रमावर गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी सडकून टीका केली. राज्य सरकारचा प्रशासन तुमच्या दारी, नव्हे तर ‘एक्स्ट्रॉशनर्स तुमच्या दारी’ हा तो उपक्रम असल्याचे ते म्हणाले.

मंत्रालयात झालेल्या विरोधी आमदारांच्या संयुक्त बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सरदेसाई म्हणाले, प्रशासन तुमच्या दारी कसले राबवता? स्वतः सत्ताधारी आमदाराचा खंडणी प्रकरणात हात आहे. गृहमंत्र्यांच्या नावाने खंडणी कोण गोळा करीत आहे? असा सवाल त्यांनी केला.

खंडणीचा आरोप सत्ताधारी आमदारांनी केला आहे. विरोधक दिशाभूल करीत असल्याचा आरोप केल्याने आम्हाला हे स्पष्टीकरण द्यावे लागत आहे. आम्ही कोणाचीही दिशाभूल करीत नाही, उलट सत्ताधारी आमदारच खंडणी गोळा केली जात असल्याचे सांगत आहेत.

खंडणीबाबतचे पत्र दुसऱ्याच्या नावाने पाठवले गेले आहे. त्यामुळे भाजप नक्की कोणाला वाचवू पाहत आहे? कोणास क्लिनचिट देऊ इच्छित आहे? असा सवालही सरदेसाई यांनी केला.

सरदेसाई म्हणाले, खंडणीचा विषय कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी मांडला होता. त्यांनीच या विषयाला वाचा फोडली आणि आता तेच हा विषय बंद झाल्याचे सांगतात. लोकशाही असल्याने यातील सत्य समाजाला समजेलच पाहिजे.

तक्रार नाहीत म्हणून पोलिस खंडणी प्रकरणाचा तपास करण्यात तयार नाहीत. याप्रकरणाची सुमोटो प्रमाणे पोलिसांनी तक्रार दाखल करायला हवी होती. जेव्हा सत्ताधारी आमदार असे प्रकार सांगतो, तेव्हा त्याची दखल घ्यायला हवी होती.

आमदार म्हणून त्यांच्या वक्तव्याची पोलिसांनी दखल घेऊन कारवाई करायला हवी होती, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

October 2026 Rules Change: 1 ऑक्टोबरपासून बदलणार 9 मोठे नियम! खिशाला लागणार कात्री, महागाई आणि बचतीवर होणार परिणाम; सणासुदीच्या तोंडावर आर्थिक झटका

Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची 'गोल्ड' हॅटट्रिक! पुरुष कंपाउंड संघाने मिळवला रोमांचक विजय; फायनलमध्ये चीनला दिली मात

Kharif Sowing Area Decline: पेरणीखालील क्षेत्र घटले, तरी खरीप उत्पादनाला फटका नाही; रब्बीसाठी केंद्राचे 177.72 दशलक्ष टनांचे लक्ष्य

Lucky Zodiac Signs: राहू-केतूची उलटी चाल ठरणार वरदान! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, संपत्ती आणि समृद्धी; मिळणार बक्कळ पैसा

Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

SCROLL FOR NEXT