Speed Radar
Speed Radar Dainik Gomantak
गोवा

Traffic Management Plan : वाहतूक व्यवस्थापन आराखडा कुठे?

विलास महाडिक

यावर्षी राज्यातील रस्ता अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी गेल्या काही महिन्यांपासून जनजागृती तसेच कठोर कारवाई सुरू करूनही अपघाताचे प्रमाण कमी होत नसल्याने सरकारी यंत्रणेसमोर आव्हान उभे राहिले आहे.

रस्ता अभियांत्रिकीकरण, वाहतूक सिग्नल्स तसेच दंडात्मक कारवाई करूनही हे अपघात रोखणे आवाक्याबाहेर गेले आहे. हे अपघात रोखण्यासाठी त्यावर चर्चा तसेच बैठका झाल्या, त्यावर सूचना मागविण्यात आल्या.

मात्र, आजतागायत त्याचा वाहतूक व्यवस्थापन आराखडाच तयार झालेला नाही. रस्त्याच्या या अपघाताला रस्तेच नव्हे तर वाहनचालकांच्या चुकाही तेवढ्याच जबाबदार आहेत.

गेल्या काही दिवसांत एकही दिवस असा जात नाही की रस्ता अपघातात मृत्यूची नोंद झाली नाही. एखादा भीषण अपघात झाला की सरकारी यंत्रणा खडाडून जागी होते. बैठका होतात मात्र त्याला काही दिवस लोटल्यानंतर त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. पुन्हा त्याकडे डोळेझाक होते.

पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी योगा जनजागृतीबरोबरच वाहतूक कायद्याचे नियम तसेच हेल्मेट व सीटबेल्ट याची जनजागृती केली होती. वाहनचालक नियमांचे पालन करत नाहीत म्हणून कायद्यात दुरुस्ती आणून दंडात्‍मक रकमेत वाढ करण्यात आली.

मात्र, त्याचा परिणाम काहीच झालेला दिसत नाही. या दुचाकी अपघातात हेल्मेट घातलेला चालक वाचतो. मात्र, मागे बसलेल्या सहचालकाचा मृत्यू होण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे या रस्ता अपघातांवर नियंत्रण ठेवण्यामध्ये पोलिस हतबल ठरले आहेत.

‘स्पीड रडार’ची गरज

या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी महामार्गावर स्पीड रडार असण्याची गरज आहे. हे स्पीड रडार खरेदी करण्याचा प्रस्ताव वाहतूक पोलिसांनी अनेक महिन्यांपूर्वी दिलेला आहे. मात्र, त्याची अजूनपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही. रस्त्याच्या बाजूने वेगमर्यादेचे फलक लावण्यासाठी सूचना करण्यात आल्या आहेत तरी त्याची पूर्तता झालेली नाही.

‘आयआरबी’ची मदत

वाहतूक पोलिस विभागात कर्मचाऱ्यांची उणीव आहे. या विभागासाठी कर्मचारी पुरविले जातील, असे सरकारकडून सांगितले जाते. मात्र, अजूनही ते मिळालेले नाहीत. राज्यात महनीय व्यक्ती तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदा होत असल्याने वाहतूक पोलिस त्याकडे वळविले गेले आहेत. त्यामुळे अनेकदा आयआरबी पोलिसांची मदत घेतली जात आहे.

यामुळे जातात बळी

पर्यटन मोसम सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात गोव्याबाहेरून वाहने आली आहेत. त्यामुळे अशा स्थितीत पोलिसांची तारांबळ उडत आहे. या वाहनांना गोव्यातील रस्त्यांचा अंदाज नसल्याने त्यांना अपघातांना सामोरे जाण्याची पाळी येत आहे. स्थानिक वाहनचालक हे अधिकतर त्यांच्या चुकांमुळे अपघातात बळी पडत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT