Goa News : जमीन सपाटीकरणाचे काम टीसीपीने रोखले : चिंबल पठारावर कारवाई

जेसीबी-ट्रक पोलिसांनी केला जप्त
TCP Department
TCP DepartmentDainik Gomantak
Published on
Updated on

चिंबलच्या पठारावरील सर्वेक्षण क्रमांक 57/1 या स्मशानभूमीजवळील जागेवर जेसीबीच्या साह्याने सुरू असलेले सपाटीकरण नगर नियोजन प्राधिकरणाच्या (टीसीपी) भरारी पथकाने आलेल्या तक्रारीची दखल घेत घटनास्थळी जाऊन ते काम बंद पाडले. पोलिसांनी काम करण्यासाठी वापरात असलेला जेसीबी आणि ट्रक आपल्या ताब्यात घेतला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जेसीबीच्या साह्याने सपाटीकरण आणि हटविण्यात आलेल्या झाडांचे क्षेत्र सुमारे 45 हजार चौरस मीटर आहे. हे काम सुरू असल्याचे जेव्हा स्थानिकांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी तत्काळ टीसीपीकडे तक्रार केली.

TCP Department
Panaji Municipal Corporation : महानगरपालिकेची मार्केटमधील इमारत होणार जमीनदोस्त..!

दुपारी साडेचारच्या सुमारास पथकाने भेट देऊन हे काम बंद पाडले. चिंबल सरपंच संदेश शिरोडकर यांनी ग्रामस्थांसह घटनास्थळी भेट दिली. त्यांच्या लक्षात आले की, सुरू असलेले काम कोणत्याही प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय किंवा एनओसीशिवाय केले जात आहे. या कामासाठी पंचायतीने कोणताही ना हरकत दाखला दिला सरपंचांनी सांगितले.

या कामासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी कामाच्या ना हरकत दाखला दाखविण्याचा आग्रह संबंधिताकडे धरला. परंतु घटनास्थळी उपस्थित असलेले ठेकेदार योगेश चोपडेकर कोणत्याही ना हरकत दाखल्याची प्रती सादर करू शकले नाहीत.

अखेर पोलिसांनी घटनास्थळी कार्यरत असलेला ट्रक आणि जेसीबी मशिनरी जप्त केली. पोलिसांनी ठेकेदार योगेशलाही पोलीस ठाण्यात नेले होते.

TCP Department
Michael Lobo : राज्यातील वाढते अपघात रोखा...आमदार लोबोंचा सरकारला सल्ला

दरम्यान, घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थांनी सरपंचांनी हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे, असे सूचविले. त्याशिवाय हे प्रकरण उच्च अधिकाऱ्यांसमोर मांडण्यास सांगितले. अशा मोठ्या प्रमाणात जमीन नष्ट करण्याच्या कामात सहभागी असलेल्या सर्व दोषींवर कारवाई करण्यास सुरुवात केली असल्याचे व याप्रकरणी गांभीर्याने आपण पावले उचलू असे आश्वासन सरपंचांनी उपस्थितांना दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com