Goa Drug Case: वागातोर येथे अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी कर्नाटक, मुंबई येथील दोघांना अटक

पोलिसांनी दोघांकडून एक लाख 05 हजार रूपये किंमतीचा अमली पदार्थ जप्त केला आहे.
Goa Drug Case
Goa Drug CaseDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Goa Drug Case: अमली पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी कर्नाटक आणि मुंबई येथील दोघांना वागातोर येथे अटक करण्यात आली आहे. दोघेही शापोरा फुटबॉल मैदानाजवळ पोलिसांना रेड हॅन्ड सापडले आहेत.

पोलिसांनी दोघांकडून एक लाख 05 हजार रूपये किंमतीचा अमली पदार्थ जप्त केला आहे.

विक्रम उमेश उप्पर (वय 21, रा. दांडेली उत्तर कन्नड, कर्नाटक) आणि साहिल अनिल उज्जनिया (वय 26, रा. मूळ माटुंगा मुंबई, महाराष्ट्र) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही शापोरा फुटबॉल मैदान येथे पोलिसांनी छापा टाकला. यात दोघांना अमली पदार्थ बाळगल्यप्रकरणी पोलिसांनी रेड हॅन्ड पकडले. त्यांच्याजवळ दीड किलो गांजा हा अमली पदार्थ सापडला असून, त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात एक लाख 05 हजार रूपये किंमत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Goa Drug Case
Fire In Goa: आगीच्या सर्व घटनांमध्ये विश्वजित राणेंचा हात, अमित पाटकरांचा संशय; म्हणाले त्यांना...

पोलिस निरीक्षक नितीन हाळर्णकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने पोलिस उप-निरीक्षक जयराम कुंकळकर, हेड कॉन्स्टेबल नित्यानंद हालरणकर, पोलिस कॉन्स्टेबल गोदीश गोलटेकर, पोलिस कॉन्स्टेबल सायमुल्ला मकानदार, पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश उत्कुरी, पोलिस कॉन्स्टेबल सुदेश मतकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

15 lakh gold jewellery theft in Goa
Goa Drug Case
Curchorem Drug Capital Goa
Liberian Drug Accused Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com