Goa Weather  Canva
गोवा

Goa Monsoon: गोव्यात 106 टक्के अधिक पाऊस! हवामान बदलाने चिंता; थंडी लांबली

Goa Rain: मॉन्सूनोत्तर काळातही एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने राज्यात मोठ्या प्रमाणात हवामान बदल जाणवत असल्याची चिंता हवामानतज्ज्ञ व्यक्त करू लागले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Rain Update 2024

पणजी: ईशान्य मॉन्सूनच्या प्रभावामुळे राज्याला पावसाचा तडाखा बसत आहे. त्यासोबतच नैऋत्य अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीय वाऱ्याच्या प्रभावातून मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. ऐन दिवाळीत पडलेल्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शिवाय थंडीनेही हुलकावणी दिली आहे.

सर्वसाधारणपणे तीन इंच आणि त्याहून अधिक पाऊस हा सर्वसाधारणपणे जून-जुलैमध्ये दिवसभरात पडतो; परंतु आता मॉन्सूनोत्तर काळातही एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने राज्यात मोठ्या प्रमाणात हवामान बदल जाणवत असल्याची चिंता हवामानतज्ज्ञ व्यक्त करू लागले आहेत.

गेल्या २४ तासांत राज्यात सरसरी एकूण ४३.३ मिमी म्हणजेच १.७० इंच पावसाची नोंद करण्यात आली. शनिवारीही मध्यम पावसाची शक्यता असल्याने गोवा वेधशाळेने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

१०६ टक्के अधिक पर्जन्य

मॉन्सूनोत्तर पावसाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत राज्यात एकूण ३४३ मिमी म्हणजेच १३.५१ इंच एवढ्या पावसाची नोंद केली आहे, जो सर्वसामान्य मॉन्सूनोत्तर पावसाच्या तुलनेत तब्बल १०६.५ टक्के अधिक आहे. गेल्या २४ तासांत फोंडा येथे ८७.४ मिमी, मुरगाव ७२.८ मिमी, म्हापसा ६७ मिमी, सांगे ५९ मिमी, वाळपई ५५.४ मिमी, साखळी ४९.६ मिमी, काणकोण ३१.२ मिमी, जुने गोवे २३.४ मिमी, पणजी २२ मिमी, तर मुरगाव येथे २०.८ मिमी पावसाची नोंद केली आहे.

अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीय वाऱ्यामुळे राज्यात पाऊस पडला. खरे तर आता थंडी पडायला सुरुवात व्हायला हवी होती; परंतु अद्याप थंडी सुरू झालेली नाही. हा हवामान बदलांचा परिणाम म्हणू शकतो; परंतु येत्या काही दिवसांत थंडी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
डॉ. रमेश कुमार एम. आर., निवृत्त शास्त्रज्ञ, एनआयओ.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WTC Points Table: भारताच्या 'क्लिन स्वीप'चा पाकिस्तानला फायदा, WTC पॉइंट टेबलमध्ये उलटफेर; दक्षिण आफ्रिकेने मारली बाजी

रस्ते खोदाल तर याद राखा!! PM मोदींच्या दौऱ्यासाठी दक्षिण गोव्यात रस्ते खोदकामावर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल

Baina Dacoity: 6वा मजला, 6 दिवस, 6 आरोपी! 'गोवा पोलिसांनी करून दाखवलं'; बायणा दरोडा प्रकरणी पीडित कुटुंबाला मोठा दिलासा

संपादकीय: पोलिसांचे मनोबल उंचावण्याची गरज, बेतुल मारहाण ते दरोडेखोरांची दगडफेक; गोव्याच्या कायदा-सुव्यवस्थेचे विषण्ण चित्र!

Goa Zilla Panchayat Election: बोरी आणि शिरोड्यात आता 'महिलाराज'! दोन्हीही जागा महिलांसाठी आरक्षित; विद्यमान जिल्हा पंचायत सदस्यांचा पत्ता होणार कट

SCROLL FOR NEXT