Goa Zilla Panchayat Dainik Gomantak
गोवा

Goa Zilla Panchayat: जिल्हा पंचायतीत 'नारीशक्ती'ला प्राधान्य, उत्तर गोवा हे अध्‍यक्ष, तर 'दक्षिण'साठी उपाध्‍यक्षपद महिलांसाठी राखीव

Goa ZP Election: राज्‍यातील दोन्‍ही जिल्‍हा पंचायतींच्‍या भावी अध्‍यक्ष आणि उपाध्‍यक्षपदांमध्‍ये महिलांना प्राधान्‍य देण्‍यात आले.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्‍यातील दोन्‍ही जिल्‍हा पंचायतींच्‍या भावी अध्‍यक्ष आणि उपाध्‍यक्षपदांमध्‍ये महिलांना प्राधान्‍य देण्‍यात आले असून, यावेळी उत्तर गोव्‍याचे अध्‍यक्ष आणि दक्षिण गोव्‍याचे उपाध्‍यक्षपद महिलांसाठी राखीव ठेवण्‍यात आले आहे. पंचायत सचिव चेष्‍ठा यादव यांनी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. दरम्‍यान, राज्‍य निवडणूक आयोगानेही मतमोजणीसाठी १५ केंद्रे निश्‍चित करून त्‍यांची यादी सोमवारी जारी केली.

जिल्‍हा पंचायत निवडणुकीसाठी येत्‍या २० डिसेंबरला मतदान होऊन २२ डिसेंबरला निकाल लागणार आहे. निकालानंतरच या निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार, हे स्‍पष्‍ट होईल. तत्‍पुर्वी पंचायत खात्‍याने उत्तर गोवा जिल्‍हा पंचायतीचे अध्‍यक्षपद आणि दक्षिण गोवा जिल्‍हा पंचायतीचे उपाध्‍यक्षपद महिलांसाठी राखीव ठेवले आहे.

दरम्‍यान, २०२७ मध्‍ये राज्‍यात विधानसभा निवडणूक होणार असल्‍यामुळे सत्ताधारी भाजपसह विरोधी काँग्रेस, आप, गोवा फॉरवर्ड, रिव्‍हॉल्‍यूशनरी गोवन्‍स (आरजीपी) या पक्षांनी जिल्‍हा पंचायत निवडणूक प्रतिष्‍ठेची बनवली आहे. या निवडणुकीत भाजपने मगोशी, तर काँग्रेसने गोवा फॉरवर्डसोबत युती केलेली असून, आप, आरजीपी, तृणमूल काँग्रेस आणि राष्‍ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हे पक्ष स्‍वतंत्ररीत्‍या निवडणुकीस सामोरे जात आहेत.

कर्मचाऱ्यांना २० डिसेंबर रोजी भरपगारी सुट्टी

जिल्‍हा पंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी २० डिसेंबरला सरकारी तसेच खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी जाहीर करण्‍यात आली आहे. यात औद्योगिक कंपन्‍यांतील, सरकारी खात्‍यांत रोजंदारीवर काम करणाऱ्या, खासगी आस्‍थापनांतील कामगारांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT