Crime theft Canva
गोवा

Goa Crime: ग्रील कापून घरात घुसले, दाम्पत्याला बांधून ठेवलं, 50 लाखांचा ऐवज केला लंपास; म्हापशात बुरखाधारी दरोडेखोरांची दहशत

Mapusa Theft: उत्तर गोव्याची मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या म्हापसा शहरात उत्तररात्री सहा अज्ञात बुरखाधारी दरोडेखोरांनी डॉ. महेंद्र घाणेकर यांच्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा घातला.

Manish Jadhav

म्हापसा: उत्तर गोव्याची मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या म्हापसा शहरात उत्तररात्री सहा अज्ञात बुरखाधारी दरोडेखोरांनी डॉ. महेंद्र घाणेकर यांच्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा घातला. बंगल्याच्या डाव्या बाजूच्या खिडकीचे लोखंडी ग्रील चौकोनी आकारात कापून ते थेट घरात घुसले आणि दाम्पत्याला बांधून ठेवले. या दरोड्यात 8 ते 10 लाखांची रोकड तसेच सोन्याचे दागिने मिळून 50 लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला. जाताना दरोडेखोरांनी डॉक्टरांच्या कारमध्ये बसून ते पसार झाले. विशेष म्हणजे, ही कार नंतर दरोडेखोरांनी पणजीत (Panaji) सोडून दिली. जी पोलिसांकडून नंतर हस्तगत केली.

दरम्यान, पहाटे 3 ते 5 वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. दरोडेखोरांनी बंगल्याच्या डाव्याबाजू‌ची खिडकीची ग्रील कापली. आधी एक दरोडेखोर आतमध्ये घुसला. त्यानंतर त्याने आपल्या इतर साथीदारांना मुख्य दरवाजा उघडून आतमध्ये घेतले. यावेळी डॉ. महेंद्रची आई किचनमध्ये स्वतःसाठी चहा करत होत्या.

दरोडेखोरही हा चहा प्यायले आणि 80 वर्षीय वृद्धे मातेला तळमजल्यावरील बाथरुमध्येच डांबून ठेवले. त्यानंतर दरोडेखोर पहिल्या मजल्यावर गेले आणि तिथे बेडरुमध्ये असलेले डॉ. महेंद्र, त्यांच्या पत्नी यांना दमदाटी करुन मारहाण केली आणि त्यांनाही बांधून ठेवले. यासाठी दरोडेखोरांनी बेडशीट, साडी फाडून दोघांचे हातपाय घट्ट बांधले. दरोडेखोर पळून गेल्यानंतर, पीडितांनी कसेबसे स्वतःला सोडून घेतले. नंतर त्यांनी घरासमोरील शेजाऱ्यांना घडलेली घटनेविषयी सांगून पोलिसांशी (Police) संपर्क साधला, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

टॅक्सीने दरोडेखोर बेळगावला पळाले

या घटनेचा पोलिसांकडून सखोल तपास सुरु आहे. या दरोड्यामागील दरोडेखोरांना 100 टक्के पकडले जाईल. तपास योग्य मार्गावर आहे. असे प्रकार घडू नये म्हणून नाकाबंदी आणखी वाढवणार असून रात्रीची पोलिस गस्त वाढवली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. या दरोड्यामागे सराईत दरोडेखोर आहेत. ते उत्तर भारतीय हिंदी भाषेत आपापसात बोलत होते. दरोडेखोरांनी डॉक्टरांची जी कार पळवली ती पणजीत आढळली. पोलिसांनी संबंधित टॅक्सीचालकांकडून आवश्यक माहिती घेवून पोलीस पथक बेळगावला रवाना झाले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'मृतांमध्ये आमच्या 20 कर्मचाऱ्यांचा जीव गेला याचे दुःख'! लुथरा बंधूंनी पोलिसांसमोर मांडली बाजू; महिन्याला 25 लाख हफ्ता देत असल्याची चर्चा

Cabo De Rama Khol: ‘खोल’ टेकडीचा 2012 पासून खुलेआम विध्वंस! प्रशासन गांधारीच्‍या भूमिकेत; CRZ प्राधिकरणाच्‍या प्रकार लक्षात आणूनही दुर्लक्ष

Vijay Merchant Trophy: टीमच्या 168 धावा, त्यात सलामीवीराचे शतक! गोव्याच्या 'अदीप'ची झंझावाती खेळी; आंध्रची सामन्यावर मजबूत पकड

Cooch Behar Trophy 2025: गोव्याच्या लेगस्पिनरची कमाल! टिच्चून मारा करत पटकावले 6 बळी; चंडीगडविरुद्धचा सामना रंगतदार अवस्थेत

Pilgao Mining: 'धडधडीमुळे झोप लागत नाही'! खाणवाहतुकीविरुद्ध ग्रामस्थ संतप्त; रस्त्यावर उतरून अडवले ट्रक Watch Video

SCROLL FOR NEXT