Goa bike theft case
Goa bike theft caseDainik Gomantak

Goa Crime: दुचाकी चोरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; कर्नाटकातील दोन युवकांना अटक, वास्को पोलिसांची कारवाई

Goa bike theft case: वास्को शहरातील विविध भागातून चोरी झालेल्या दुचाकी प्रकरणांची उकल करत पोलिसांनी कर्नाटकातील दोन युवकांना अटक केली आहे.
Published on

पणजी: वास्को शहरातील विविध भागातून चोरी झालेल्या दुचाकी प्रकरणांची उकल करत पोलिसांनी कर्नाटकातील दोन युवकांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्यांची नावे वैभव दत्तात्रय रणदिवे (१९) आणि अझरन इक्बाल शेख (१८) अशी आहेत. हे दोघेही कर्नाटक राज्यातील रहिवासी असून वास्को परिसरात येऊन दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये सहभागी होते.

वास्को पोलिस ठाण्याच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्यांनी वास्को शहरातील वेगवेगळ्या ठिकाणांहून तीन दुचाक्या चोरल्याची माहिती आहे.

Goa bike theft case
Goa Politics: 'भाजपला पराभूत करण्‍यासाठी गोवा फॉरवर्ड आणि आरजीपीला सोबत घेऊन लढू', पाटकरांनी केले युतीचे सूतोवाच

या कारवाईनंतर पोलिसांनी दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, या दोघांचा संबंध इतर चोरीच्या घटनांशीही आहे का याबाबत तपास सुरू आहे.

Goa bike theft case
Goa Ranji Cricket: गोव्याला मिळणार नवा कर्णधार? रणजी संघाला नेतृत्वबदलाचे वेध; 15 ऑक्टोबरपासून एलिट गटाची मोहीम

वास्को पोलिस निरीक्षकांनी सांगितले की, शहरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. नागरिकांना आपल्या वाहनांवर सुरक्षा लॉक बसवण्याचे आणि सार्वजनिक ठिकाणी वाहन पार्क करताना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com