Water Shortage In Sattari Dainik Gomantak
गोवा

Water Shortage In Sattari: ऐन दिवाळीत सत्तरीत पाणी टंचाई; टँकर सेवाही पडतेय अपुरी

Water Shortage In Sattari महिनाभरापासून आठवड्यातून फक्त दोन ते तीन दिवस तेही काही तासांसाठीच पाणी उपलब्ध

Ganeshprasad Gogate

Water Shortage In Sattari Goa यंदा गोव्यात बऱ्यापैकी पाऊस पडला असला तरी उत्तर गोव्यातील सत्तरी भागात ऐन दिवाळीत पाणी टंचाई जाणवल्याचे चित्र सध्या दिसतंय. मागील महिनाभरापासून आठवड्यातून फक्त दोन ते तीन दिवस तेही काही तासांसाठीच नळांना पाणी येत असून या भागात पाण्याच्या टॅंकरची सेवाही अपुरी पडतेय.

गोव्यात सामान्यतः जून ते सप्टेंबर हा पावसाचा काळ समजला जातो. ऑक्टोबरच्या सुरवातीला गोव्यातून मॉन्सूनच्या पावसाची माघार होत असते.

तथापि, यंदाच्या मॉन्सूनच्या हंगामात बदल झाला असून मागील आठवडाभरापूर्वी गोव्यात पावसाच्या सरी बरसल्या, विशेष म्हणजे हवामान खात्याने 30, 31 ऑक्टोबर या दोन दिवसांसाठी यलो अलर्टही जारी करण्यात आला होता.

थोडक्यात यंदा गोव्यात दरवर्षीपेक्षा चांगला पाऊस झाला असूनही पावसाळा संपताच लगेच पाणी टंचाईचे चित्र निर्माण झाल्याने स्थानिकांमधून नाराजी व्यक्त होतेय.

गेल्या दोन वर्षापासुन सालेली गावातील पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात भासत आहे. सालेली गावात सुमारे 350 च्या आसपास लोकवस्ती असुन एकुण 7 वाडे या गावात आहे. या गावात एक दिवस सोडून म्हणजे दोन दिवसाने एक दिवस ते सुध्दा फक्त दोन किंवा चुकुन तीन तास अश्या प्रकारे नळाला पाणी पुरवठा केला जातो आहे.

तसेच बोडणवाडा, वरचावाडा आणि केळबाय वाडा या वाड्यांवर तर नळाला पाणीच चढत नसल्याने. येथील नळ शोभेची वस्तु बनली आहे. काही वेळेले केळबाय वाडा व वरचावाडा येथे चुकुन पाणी येते मात्र बोडनवाडा येथे तर कधी पाणीच येत नाही.

त्यामुळे या तीन्ही गावाना टॅंकरच्या पाण्यावर अवलंबुन रहावे लागत आहे. हा टॅंकरसुध्दा दोन दिवसाने एक दिवस गावात खेपा मारत असतो. त्यामुळे हे पाणी गावातील नागिरकांना पुरत नाही.

गावातील नागरिक रोज रोजच्या या त्रासाला टंकाळले आहे. तसेच दोन दिवसाने एक दिवस नळाला पाणी येत असल्याने काही ठिकाणी टॅंकरावरच अवलंबुन रहावे लागत आहे.

एकाबाजूला सर्वत्र दिवाळीचा उत्सव सुरू असताना सालेली सत्तरीतील लोकांना मात्र पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागतेय. यामुळे दिवाळीच्या उत्साहावर पाणी फिरल्याचे चित्र आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

SCROLL FOR NEXT