गोव्यासह विविध शहरात विक्रीसाठी येणारे 15 कोटीचे अमली पदार्थ मुंबईत जप्त; झांबिया, टांझानियाच्या दोघांना अटक

गोव्यासह विविध शहरात विक्रीसाठी येणारे 15 कोटीचे अमली पदार्थ मुंबईत जप्त; झांबिया, टांझानियाच्या दोघांना अटक

या कारवाईत झांबियाचा नागरिक आणि टांझानियन महिलेला अटक करण्यात आली आहे.
Published on

मुंबई अमली पदार्थ पथकाने आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. गोवा आणि इतर ठिकाणी विक्रीसाठी येणारे तब्बल पंधरा कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ पथकाने जप्त केले आहेत.

या कारवाईत झांबियाचा नागरिक आणि टांझानियन महिलेला अटक करण्यात आली आहे.

“जप्त करण्यात आलेले अमली पदार्थ गोवा, बेंगळुरू, दिल्ली, हैदराबाद आणि इतर शहरांमध्ये विक्रीसाठी नेला जात होता. सणासुदीच्या काळात जेव्हा कोकेनसारख्या अमली पदार्थांची पार्टीत मागणी वाढते. अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी पथक करत असलेल्या प्रयत्नाचा ही कारवाई एक भाग होती,” असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पथकाच्या हाती लागलेल्या माहितीनुसार, झांबियन नागरिक गिलमोर हा अमली पदार्थासह मुंबईत येणार असल्याची माहिती समोर आली. गिलमोर मुंबईतील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होता.

दरम्यान, एनसीबी मुंबई अधिका-यांचे एक पथक मुंबईस्थित हॉटेलवर पाळत ठेवण्यासाठी नियुक्त करण्यात आले. ९ नोव्हेंबर रोजी, गिलमोरने हॉटेलमध्ये चेक इन केल्याचे निश्चित झाले. त्यानंतर गिलमोरला ताब्यात घेऊन तपास करण्यात आला.

सुरुवातीला, सामानातून कोणतीही संशयास्पद वस्तू मिळाली नाही परंतु कॅरीबॅगची बारकाईने तपासणी केल्यावर बॅगमधून 2 पाकिटे जप्त करण्यात आली. यात 2 किलो वजनाचे कोकेन सापडले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com