पणजी: राज्यातील सराईत गुन्हेगारांवर (हिस्ट्री शीटर) नजर ठेवण्यासाठी पोलिस मोहीम राबवण्यात आली. यावेळी उत्तर गोवा पोलिस स्थानकात नोंद असलेल्या गुन्हेगारांची पडताळणी करण्यात आली.
नव्याने ११ जणांचा या सराईत गुन्हेगार यादीमध्ये समावेश करण्यात आल्याने या जिल्ह्यातील त्यांची संख्या १३५ झाली आहे, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली.
गेल्या एका महिन्यात उत्तर गोवा पोलिस क्षेत्रामध्ये भाडेकरू तसेच बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या परदेशींची पडताळणी मोहीम (कोम्बिंग ऑपरेशन) राबवण्यात आली.
या मोहिमेवेळी सुमारे २८ हजार भाडेकरूंची तपासणी केली तसेच ६१७ परदेशींची तपासणी करण्यात आली. या तपासणीवेळी १६४८ व्यक्तींना अटक करण्यात आली तर २४१ जणांना विविध प्रतिबंधात्मक कारवाई कलमाखाली अटक करण्यात आली.
११ जणांचा सराईत गुन्हेगारांची नोंद असून त्यात ग्लोन आनंद पेडणेकर (६ गुन्हे दाखल), योगेश सुधाकर गोवेकर (९ गुन्हे दाखल), जवाहरलाल तुकाराम शेट्ये (६ गुन्हे दाखल) , सुरेंद्र ऊर्फ सुरेन भरत पॉल (३ गुन्हे दाखल), करन किरण चोडणकर (४ गुन्हे दाखल), दुर्गादास चंद्रकांत मोरजकर (३ गुन्हे दाखल), विजयनाथ केळूराव गावडे (४ गुन्हे दाखल), नासीर हुसेन जमादार ( ३ गुन्हे दाखल) लतीफ सुलेमान तलवार (४ गुन्हे दाखल), वरदराज अशोक टेमकर (३ गुन्हे दाखल), सर्वेश मुरारी गोवेकर (११ गुन्हे दाखल) याचा समावेश आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.