Goa Police On Calangute Safety Dainik Gomantak
गोवा

Calangute Crime: पोलीस- क्लब मालकांची बैठक; SP नी दिली तंबी; हॉटस्पॉटबाबत मोठी घोषणा

Goa Police On Calangute Safety: उत्तर गोवा पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी कळंगुटमधील मुख्य क्लब मालक विशेषतः टिटोज लेनमधील आस्थापनांच्या धारकांसोबत समन्वय बैठक घेतली.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News: गेल्या आठवड्याभरात कळंगुटमधील काही हिंसक घटना तसेच येथील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने बुधवारी (ता.१६) सायंकाळी उत्तर गोवा पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी कळंगुटमधील मुख्य क्लब मालक विशेषतः टिटोज लेनमधील आस्थापनांच्या धारकांसोबत समन्वय बैठक घेतली. यावेळी क्लबधारकांनी आपल्या आस्थापनातील कर्मचाऱ्यांची पोलिस पडताळणी करण्यासोबतच, कुणीही कायदा हातात घेवू नये, असे निर्देश अधीक्षकांनी उपस्थितांनी दिले आहेत.

जर कुणी आस्थापनात येवून धुडगूस घालत असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याची सूचना एसपींनी क्लब तथा आस्थापन मालकांना दिले आहेत. नवीन पर्यटन हंगामात पर्यटक अनुकूल पोलिसिंगवर भर असेल. जेणेकरुन पर्यटकांना सुरक्षित वाटावे व माघारी जातेवेळी चांगल्या स्मृती घेऊन त्यांनी परतावे, यासाठी पोलिस कटिबद्ध असल्याचे अधीक्षक कौशल म्हणाले. या बैठकीला उपअधीक्षक विश्वेश कर्पे व पोलीस निरीक्षक राहुल परब हे उपस्थित होते. सुमारे ४० आस्थापनांच्या मालकांनी या समन्वय बैठकीत सहभाग घेतला.

माध्यमांशी बोलताना अधीक्षक अक्षत कौशल म्हणाले की, कायदा-सुव्यवस्थता राखण्यासोबत टिटोज लेन व कळंगुटमधील मुख्य क्लब मालकांसोबत आज समन्वय बैठक घेतली. पोलिस क्लब-मालकांसोबत समन्वयाने काम करणार आहेत.

हॉटस्पॉटवर नजर

पोलिस गस्तविषयी बोलताना अधीक्षक म्हणाले की, गस्तसाठी विशेष योजना आखली असून जे हॉटस्पॉट आहेत, तिथे पोलिसांची उपस्थिती संख्या वाढवली आहे. यासाठी अतिरिक्त आयआरबी कर्मचाऱ्यांचा वापर केला जात आहे. तसेच रात्रीच्या वेळी नाकाबंदी देखील केली जात आहे. तसेच ध्वनीप्रदूषणाचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी असे क्लबधारकांना निर्देश दिलेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT