Calangute Crime: 'नाईट लाईफ' नव्हे ही तर वाईट लाईफ! कळंगूटची प्रतिमा मलीन का होतेय?

Goa Nightlife Problems: कळंगुटची प्रतिमा काही घटनांमुळे मलिन होत चालली आहे. पर्यटक व स्थानिकांमधील वाढते वाद, अनधिकृत टाऊट्स-गाईड्‌सचा सुळसुळाट, बाऊन्सर संस्कृती व मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत सुरू राहणाऱ्या रेस्टॉरंट्स, पबमुळे या परिसरात ‘नाईट लाईफ’ची संस्कृती रुजू लागली आहे
Calangute Crime: 'नाईट लाईफ' नव्हे ही तर वाईट लाईफ! कळंगूटची प्रतिमा मलीन का होतेय?
Published on
Updated on

Goa Beach Crime And Illegal Activities Due To Night Life Party Culture

पणजी: जगप्रसिद्ध किनारपट्टी लाभलेल्या कळंगुट गावाची प्रतिमा अलीकडच्या काही घटनांमुळे मलिन होत चालली आहे. तसेच पर्यटक व स्थानिकांमधील वाढते वाद, किनाऱ्यांवर अनधिकृत टाऊट्स-गाईड्‌सचा सुळसुळाट, फोफावत चाललेली बाऊन्सर संस्कृती व मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत सुरू राहणाऱ्या रेस्टॉरंट्स, पबमुळे या परिसरात ‘नाईट लाईफ’ची संस्कृती रुजू लागली आहे. दुसरीकडे परप्रांतीय व्यावसायिकांमध्‍ये वर्चस्वासाठी सुरू असलेल्‍या स्पर्धात्मक लढाईमुळे कळंगुटमधील सुरक्षिततेसोबतच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍‍न ऐरणीवर आला आहे.

एकीकडे प्रशासकीय पातळीवर डान्सबारना परवानगी मिळत नाही. तरीही, काही आस्थापने ‘बार अँड रेस्टॉरंट’च्या नावाखाली बेकायदेशीरपणे डान्सबार थाटतात. मध्यंतरी न्यायालयाच्या निर्देशानंतर, प्रशासनाने कळंगुट येथे डझनभर डान्सबारना टाळे ठोकले होते. आजही अधूनमधून या आस्थापनांत गैरप्रकार चालतात. मसाज-पार्लरच्या नावे वेश्याव्यवसाय चालवला जातो. अशा डान्सबारवरून स्थानिक व पंचायतीमध्ये अनेकदा संघर्ष पाहायला मिळतो.

नुकताच, बागा येथे ‘टिटोज लेन’मध्ये ‘डाऊन टाऊन’ क्लबबाहेर या आस्थापनाचे बाऊन्सर व इतर कर्मचाऱ्यांनी मिळून दोघा स्थानिक भावांवर हल्ला चढवला. त्‍यात एकाला १२ तर दुसऱ्याला ८ टाके पडले. त्यामुळे हा वाद चिघळला आणि प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. या संतप्त प्रकारामुळे ग्रामस्थ रस्त्यावर उतरले व त्‍यांनी हल्लेखोरांवर कडक कारवाईच्या मागणीसाठी पोलिस स्थानकावर मोर्चा वळविला.

दुसरीकडे कळंगुटमधील गेल्या तीन-चार दिवसांतील दोन हिंसक प्रकरणांत कारवाई करण्यास दिरंगाई व निष्काळजीपणा दाखविल्याचा ठपका ठेवून पोलिस प्रशासनाने दोघा पोलिस अधिकाऱ्यांची राखीव दलात बदली केली. या घटनांमुळे कळंगुट हा गाव पुन्हा आपल्या नाईट-लाईफच्या गडद बाजूमुळे लाईमलाईटमध्ये आला आहे.

बदली झालेल्यांमध्‍ये पोलिस निरीक्षक परेश नाईक व उपनिरीक्षक किरण नाईक यांचा समावेश आहे. त्यामुळे कळंगुटमधील कायदा-सुव्यवस्था कोलमडली आहे, असे चित्र निर्माण झाले आहे. जोपर्यंत पोलिसांना वरिष्ठांचे निर्देश मिळत नाही, तोपर्यंत पोलिस कारवाई करण्यास धजावत नाहीत किंवा राजकीय दबावापोटी पोलिस आपला हात आखूडता घेतात.

काही वर्षांपूर्वी कळंगुटला कधीही गेल्‍यावर तेथील निसर्गसौंदर्य विशेषत: समुद्रकिनाऱ्यावर मौजमजा करता येत होती. पण आता ‘गेले ते दिन गेले’ असे म्‍हणण्‍याची वेळ आली आहे. कारण संध्‍याकाळी ७ नंतर तर किनारपट्टी भागात जाण्‍याची सोय राहिलेली नाही. सर्वत्र कर्णकर्कश संगीत, कोपऱ्याकोपऱ्यांवर उभ्‍या असलेल्‍या मुली, ड्रग्‍स तस्‍करी आणि असे अनेक अवैध धंदे सुरू असतात. सध्‍याचा युवक त्‍या भरटकत चाललाय.

विविध आमिषे दाखवून पर्यटकांची लूट

किनारपट्ट्यांत हे टाऊट्स पर्यटकांना नको ती आमिषे दाखवून लुटतात. हे प्रकार कळंगुट किंवा गोव्यासाठी नवीन राहिलेले नाहीत. आजही लुबाडणुकीचे प्रकार सर्रास सुरू आहेत. काहींना वाचा फुटते तर काही प्रकरणे दाबली जातात. यावर आमदार मायकल लोबो म्हणाले की, ज्या बेकायदा टाऊट्स-गाईडना पकडले जाते, त्यांना किमान २५ हजार रुपये दंड ठोठावला पाहिजे, जेणेकरून कायद्याची धास्ती त्‍यांना बसेल. यासाठी सरकारने कायद्यात आवश्यक तरतूद करावी.

Calangute Crime: 'नाईट लाईफ' नव्हे ही तर वाईट लाईफ! कळंगूटची प्रतिमा मलीन का होतेय?
Calangute Crime: 'कळंगुट'चे वातावरण का झाले आहे गढूळ? गैरप्रकार, पर्यटक-स्थानिक संघर्षाला निर्बंध घालण्याचे आव्हान

किनारपट्टीला अनधिकृत टाऊट्सचा विळखा

कळंगुट पंचायत असो किंवा स्थानिक आमदार, दरवेळी अशा घटना घडल्यानंतर, टाऊट्स-गाईडविषयी हमखास ते भाष्य करतात. पोलिसांनी मध्यंतरी टाऊट्सवर कारवाई केली खरी, मात्र अनधिकृत टाऊट्सचा कळंगुटला लागलेला विळखा अद्याप सुटलेला नाही. उलट या टाऊट्सची संख्या दिवसेंगणिक वाढत आहे. सरकार व स्थानिक यंत्रणांनी यावर कायमचा तोडगा काढणे आवश्यक आहे. कारण स्थिती हाताबाहेर गेल्यानंतर एकमेकांकडे बोट दाखवून काहीच साध्य होत नसते. कारण गमावलेले वैभव परत मिळण्यास वर्षे उलटतील.

ग्रामपंचायतीने कधी कुठल्या डान्सबारना परवानगी दिली, ते दाखवावे. कायद्यात तशी तरतूद आहे का? आम्ही फक्त पंचायतराज कायद्यानुसारच परवानगी देतो. काहीजण अकारण पंचायतीला लक्ष्य करतात. कळंगुट पंचायत डान्सबारविरोधातच आहे. विशेष म्हणजे, पंचायतीला नामांकित लोकांचे तसेच दिल्लीतून फोन येतात. परवानगी द्यावी यासाठी पंचायत सचिवांवर दबाव टाकला जातो. कुणी स्पा-साठी तर कोणी डान्‍सबारसाठी परवानगी मागतो. आम्ही नकार देतो तेव्‍हा ते लोक पंचायत संचालकांकडे धाव घेतात. अशावेळी पंचायतीने करावे तरी काय? स्थानिक पंचायत सर्व अतिक्रमणांवर कारवाई करणार आहे. ‘भारत’ बार ते ‘टिटोज’ लेनमधील सर्व अतिक्रमणे हटविली जातील.

जोसेफ सिक्वेरा, (सरपंच, कळंगुट)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com