North Goa Police Tenant Verification Dainik Gomantak
गोवा

Goa Tenant Verification: उत्तर गोवा पोलिस अ‍ॅक्शनमोडवर! भाडेकरु पडताळणी मोहिमेस पुन्हा वेग; बेकायदा राहणाऱ्यांची खैर नाही

North Goa Police Tenant Verification: उत्तर गोव्यात भाडेकरु पडताळणी मोहिमेने पुन्हा एकदा जोर धरला आहे. विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी भाडेकरु पडताळणी मोहिम सुरु केली आहे.

Manish Jadhav

North Goa Police Conducts Tenant Verification Drive Across Key Areas

पणजी: उत्तर गोव्यात भाडेकरु पडताळणी मोहिमेने पुन्हा एकदा जोर धरला आहे. विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी भाडेकरु पडताळणी मोहिम सुरु केली आहे. मोपा, कोलवाळ, म्हापसा, साळगाव पोलिसांनी मोपा, थिवी रेल्वे स्थानक परिसर, म्हापसा बस स्टॉप त्याचबरोबर साळगाव येथील काही प्रभागांमध्ये भाडेकरुंच्या टेनंट फॉर्मची तपासणी केली. टेनंट फॉर्म जमा न केलेल्या भाडेकरुंवर कारवाई करण्यात येणार असल्याची तंबीही देण्यात आली. त्यामुळे भाडेकरुंमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

आतापर्यंत तब्बल 2.5 लाख घरांची पडताळणी पूर्ण

दरम्यान, राज्यात गोवा भाडेकरु पडताळणी कायद्याची अंमलबजावणी सुरु झाल्यापासून आतापर्यंत तब्बल 2.5 लाख घरांची पडताळणी पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले आहे. जे घरमालक भाडेकरुंची माहिती देत नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची तरतूद देखील कायद्यात करण्यात आली आहे.

वाढत्या गुन्हेगारीला आळा

राज्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गोवा पोलिस धडक कारवाया करत आहे. दोन दिवसांपूर्वीच, गिरी येथे भाड्याच्या घरात राहून हायड्रोफोनिक वीड्सचे उत्पादन घेणाऱ्या एका व्यक्तीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यथ आले. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल 11 कोटींचा अंमलीपदार्थ जप्त केला. त्यामुळे आता पुन्हा एकदा गोवा पोलिसांनी (Goa Police) राज्यात बेकायदा राहणाऱ्यांच्याविरोधात कंबर कसली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT