Tenant Verification Goa: भाडेकरू पडताळणीचा शेवटचा दिवस; राहिलेल्यांनी त्वरित नोंदणी करावी मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Tenant Verification Last Date: राहिलेल्यांनी येत्या ४ ते ५ दिवसांत नोंदणी करून घ्यावी कारण त्यानंतर कोणाचीही गय केली जाणार नाही मुख्यमंत्र्यांचे आवाहन
Goa Police
Goa PoliceDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Goa News: गोव्यात जुलै महिन्यापासून भाडेकरू पडताळणी मोहीम सुरु झाली. भाडेकरू पडताळणी मोहिमेची मुदत आज संपुष्टात येत असली तरी राहिलेल्यांनी येत्या ४ ते ५ दिवसांत नोंदणी करून घ्यावी कारण त्यानंतर कोणाचीही गय केली जाणार नाही, पोलीस अशा लोकांच्या विरोधात थेट दंडात्मक कारवाई करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

Goa Police
Dhillon Murder Case: नरोत्तम सिंग धिलॉन खून प्रकरणी 22 वर्षीय संशयित पूजाला सशर्त जामीन

गोव्यात अनेक लोकं येत असतात आणि त्यांची ओळख पटावी आणि राज्यात वाढलेल्या गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी म्हणून सरकारने ही मोहीम सुरु केली होती. या मोहिमेतून गोव्यात राहणाऱ्या भाडेकरूंची गुन्हेगारी पार्श्वभूमी ओळखण्यात पोलिसांना मदत होणार असल्याची संकल्पना मांडण्यात आली होती.

घर मालकांकडून वेळोवेळी भाडेकरूंची माहिती पोलिसांना न दिल्याने गुन्हेगारांचा शोध घेणं कठीण झालं होतं. धारबांदोडा, फोंडा, वाळपई अशा विविध भागांमध्ये पोलिसांनी जात या मोहिमेबद्दल जागृती निर्माण करत भाडेकरूंच्या पडताळणीला सुरुवात केली. राज्यभरातून या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि जवळपास हजारोंच्या संख्येत लोकांनी अर्ज भरून दिल्याची माहिती सामोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Congress Party Registration Dispute
Goa Registration Amendment Bill 2026
Goa Transport Department Action
Goa University NAD Registration
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com