Saleli Accident Case: सालेली येथे 2017 मध्ये झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला म्हापसा येथील उत्तर गोवा मोटार अपघात लवादाने मोठा दिलासा दिला. लवादाने विमा कंपनीला पीडिताला 1.30 कोटींची भरपाई देण्याचा आदेश दिला. लवादाच्या अध्यक्षा शर्मिला पाटील यांनी हा भरपाईचा आदेश दिला.
होंडा-वाळपई राज्य मार्गावरील सालेली येथे 2017 मध्ये भीषण अपघात झाला होता. साखळीहून वाळपईला रात्री 12.05 वाजता जात असताना सालेली येथे कारचालक कमालउद्दीन सय्यद मोहम्मद शेख याचा कारवरील ताबा सुटला होता. त्याची कार (Car) विजेच्या खांबाला जावून धडकली होती, ज्यात तन्वीर आगा जखमी झाला होता. तन्वीरवर पहिल्यांदा साखळीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले, त्यानंतर त्याला ताबडतोब गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे तन्वीरला शारिरीकदृष्ट्या 100 टक्के अपंगत्व आले. त्यामुळे त्याला पोलिस खात्यातील नोकरी गमवावी लागली. अपघातावेळी त्याचे वय 25 वर्षे होते.
दरम्यान, पीडीत तन्वीरला 6 टक्के व्याजदरासह 1.30 कोटींची भरपाई देण्याचा आदेश म्हापसा येथील उत्तर गोवा मोटार लवादाच्या अध्यक्षा शर्मिला पाटील यांनी दिला. सालेली येथील अपघात प्रकरणी वाळपई पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला होता. वाली उर्फ तन्वीर आगाने भरपाईचा दावा मोटार लवादाकडे केला होता. त्याने या दाव्यात तब्बल 85 लाखांची नुकसान भरपाई मागितली होती. यात त्याने कारमालक कमालउद्दीन सय्यद मोहम्मद शेख आणि इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांना प्रतिवादी केले होते.
वकील आर.आर सावईकर यांनी मोटार आयोगासमोर पीडित तरुण आगाकडून बाजू मांडली. यामध्ये साखळी आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांची साक्ष आगासाठी महत्त्वाची ठरली. लवादाने सुप्रीम कोर्ट आणि इतर न्यायिक निवाड्यांचा हवाला देत पीडित तरुण आगाला 1.30 कोटींची भरपाई देण्याचा आदेश दिला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.