Shripad Naik BJP North Goa Candidate 
गोवा

Shripad Naik North Goa: गाव वाचवा मगच प्रचाराला या! श्रीपाद नाईक यांना मुळगावात घेरले!

North Goa: श्रीपाद नाईक यांची प्रचारसभा सुरू होताच मुळगाववासीयांनी खाण लीज क्षेत्रातून धार्मिक स्थळे आणि घरेदारे बाहेर काढा, अशी मागणी केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Shripad Naik BJP North Goa Candidate

उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार श्रीपाद नाईक यांना मुळगाव येथील जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला. खाण परिक्षेत्राच्या मुद्द्यावरून आधीच नाराज असलेल्या मुळगावच्या जनतेने खाणीच्या प्रश्नावरून श्रीपाद नाईक यांना कोंडीत पकडले. याप्रश्नी लक्ष घालण्याचा शब्द देऊन श्रीपाद नाईक यांनी कशीबशी एकदाची सुटका करून घेतली.

श्रीपाद नाईक यांनी बुधवारी (दि.03) डिचोली मतदारसंघात झंझावाती प्रचार सुरू केला. गावकरवाडा-डिचोली येथे प्रचारसभा आटोपून श्रीपाद नाईक मुळगाव येथे आले. त्यांच्याबरोबर आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि भाजपचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

श्रीपाद नाईक यांची प्रचारसभा सुरू होताच मुळगाववासीयांनी खाण लीज क्षेत्रातून धार्मिक स्थळे आणि घरेदारे बाहेर काढा, अशी मागणी केली. या मागणीबाबत सरकारकडून आश्वासनाशिवाय मिळालेले नाही,असा मुद्दा श्री केळबाय देवस्थानचे अध्यक्ष वसंत गाड यांनी उपस्थित केला.

सध्या खाण व्यवसाय सुरू असून, तिसऱ्या पाळीतही काम सुरू आहे. स्थानिक कामगारांवरही कंपनीने अन्याय केला आहे. आदी मुद्दे वसंत गाड, स्वप्नेश शेर्लेकर आणि इतरांनी श्रीपाद नाईक यांच्यासमोर मांडले. याप्रश्नी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढू,असे आश्वासन देताच मुळगाववासीय शांत झाले.

गाव वाचवा मगच प्रचाराला या!

अगोदर आमचा गाव वाचवा, नंतरच प्रचारासाठी या, असेही लोकांचे म्हणणे होते. मुळगाववासीयांच्या या पवित्र्यामुळे प्रचारसभेवेळी वातावरणही किंचितसे तापले. २ मे पर्यंत जनतेच्या इच्छेप्रमाणे निर्णय व्हावा. अन्यथा मुळगाववासीय वेगळा विचार करतील,असे वसंत गाड यांनी सुनावले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

Colvale Central Jail Security: कोलवाळ कारागृहात सध्या चाललेय काय? सुरक्षेचा फज्जा, गुन्हेगारी नेटवर्क जोमाने कार्यरत

Pakistan Youth Protest: पाकिस्तानी गृहमंत्र्यांना 'कॉकरोच' आंदोलनाची भीती, शाहबाज सरकारला दिला घरचा आहेर; तरुणांच्या संतापाकडे वेधले लक्ष

SCROLL FOR NEXT