Arm's Prohibited In Goa Dainik Gomantak
गोवा

Arm's Prohibited In Goa: उत्तर आणि दक्षिण गोव्यात शस्त्रे बाळगण्यास बंदी; आचार संहिता लागू असेपर्यंत मनाई

Arm's Prohibited In Goa: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर आणि दक्षिण गोव्यात शस्त्रे बाळगण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Pramod Yadav

Arm's Prohibited In Goa

देशात आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली असून, सर्व राज्यातील प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. गोव्यात देखील विविध यंत्रणा अवैध घडमोडींवर लक्ष ठेऊन आहेत, शिवाय काही गैरप्रकार होऊ नये यासाठी आवश्यक मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर आणि दक्षिण गोव्यात शस्त्रे बाळगण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबत जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी मनाई आदेश जारी केला आहे.

संपूर्ण उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्यात सर्व प्रकारची शस्त्रे, अग्निशस्त्रे, दारुगोळा, प्राणघातक शस्त्रे, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर, चौकात, गल्लीबोळात किंवा कोणत्याही खुल्या जागी जवळ बाळगण्यास आचार संहिता लागू असेपर्यंत मनाई केली आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात म्हटले आहे. आदेशाचे उल्लंघन आयपीसीच्या कलम 188 नुसार दंडनीय आहे.

दरम्यान, या आदेशातून सार्वजनिक सेवक, पोलीस, संरक्षण कर्मचारी आणि कर्तव्यावर असलेले सुरक्षा कर्मचारी / क्रीडा व्यक्ती जे भारतीय राष्ट्रीय रायफल असोसिएशनचे सदस्य आहेत, बँकांचे जबाबदार व्यक्ती आणि त्यांचे राखणदार यांना सूट देण्यात आली आहे.

दक्षिण आणि उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत राहणार आहे.

उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी पणजी येथील फेरी धक्क्याजवळील सर्व्हिस लेन केवळ निवडणूकीत वापरण्यात येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंग म्हणून अधिसूचित केली आहे. ही अधिसूचना तात्काळ लागू होईल आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहील, असे आदेशात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Paresh Joshi: धड पडेपर्यंत इतरांसाठी धडपडणारे, परक्यांसाठीही ईश्वर ठरलेले 'परेश जोशी'

'लोकांची घरां कोण मोडता तें हांव पळयता'; CM सावंतांचे विरोधकांना प्रत्त्युत्तर, बेकायदेशीर प्लॉटिंगवरून विधानसभेत वाद

Pigeon Feeding Ban: सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य देण्यावर बंदी घालावी, विजय सरदेसाईंची मागणी

Goa Assembly: गोमंतकीयांना मिळणार स्वस्त दरात मासळी, सरकार धोरणात्मक निर्णय घेणार - मुख्यमंत्री

Sunburn Goa:"सनबर्न नाही तर दुसरं कोणीतरी येईल" पर्यटनमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT