Goa Latest Crime News Canva
गोवा

Goa Crime: टॅक्सीचालकाने केले अल्पवयीन मुलीशी लग्न; घरी गेल्यावर उलगडला खरा प्रकार, कर्नाटकातील तरुणाच्या आवळल्या मुसक्या

Chimbel Child Marriage Case: अल्पवयीन मुलीशी लग्न करून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यामुळे एका बिगर गोमंतकीय पण सध्या चिंबल येथे राहणाऱ्या टॅक्सीचालकाला पोलिस कोठडीत बसण्याची वेळ आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Chimbel Child Marriage Case Taxi Driver Arrested

फोंडा: अल्पवयीन मुलीशी लग्न करून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यामुळे एका बिगर गोमंतकीय पण सध्या चिंबल येथे राहणाऱ्या टॅक्सीचालकाला पोलिस कोठडीत बसण्याची वेळ आली आहे. फोंडा पोलिसांनी अटक चुकवत फिरणाऱ्या या टॅक्सीचालकाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षीच्या शुभारंभीच चिंबल येथे राहणाऱ्या येसूनाथ रामण्णा लकमपूर (२८) हावेरी-कर्नाटक याने कर्नाटक राज्यातीलच एका अल्पवयीन मुलीशी तिस्क-उसगाव येथे लग्न केले.

ही मुलगी लग्न करून येसूनाथ याच्यासोबत चिंबल येथे गेली खरी पण तेथे गेल्यावर येसूनाथचे आधीच एक लग्न झाल्याचे तिला समजल्यानंतर तिने परत आपले कर्नाटकातील मूळ गाव गाठले.

त्यानंतर या प्रकरणाची पोलिस चौकशी झाली असता लग्न तिस्क-उसगाव येथे झाल्यामुळे प्रकरण फोंडा पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.मोबाईलच्या लोकेशनवरून येसूनाथला फोंडा पोलिसांनी हुडकून काढले आणि अटक केली.

आणखी चौघांवर गुन्हे

सध्या या प्रकरणात येसूनाथ याच्यासह यल्लव्वा लकमपूर (४०) हावेरी-कर्नाटक, लक्ष्मण वडार (६०) व भास्कर वडार (४०) तिस्क - उसगाव, लक्ष्मी वडार (३४) शिरवाड-कारवार यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले असून पोलिस पुढील चौकशी करीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT