MLA Venzi Viegas Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: ‘आप’तर्फे व्हें‍झींना दक्षिणेतून उमेदवारी

दैनिक गोमन्तक

Goa Politics: लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपाच्या चर्चेसाठी काँग्रेसला धावपळ करण्यास लावण्यासाठी आम आदमी पक्षाने (आप) आज रणनीतीचा एक भाग म्हणून दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांची उमेदवारी जाहीर केली.

असे असले तरी या विषयावर संयुक्त चर्चेसाठी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि आपचे राज्य संयोजक ॲड. अमित पालेकर यांनी सहमती दर्शवली आहे. गुरुवारी मुंबईत या दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांची बैठक होणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभेच्या गोव्यातील दोन्ही जागा आपकडून कॉंग्रेसला दिल्या जाऊ शकतात. ती 2027 ची विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढण्याची तयारी असेल. ‘आप’ला उत्तर व दक्षिण गोव्यातील सद्यःस्थितीतील राजकीय बळाची कल्पना आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक तयारीसाठी उसंत घेत लोकसभा निवडणूक कॉंग्रेसकडे सोपवण्याचा विचार आपने चालवला आहे.

दिल्ली, पंजाबमध्ये ‘आप’ला सर्वच जागा लढवण्याची इच्छा आहे. त्याठिकाणी एखाद दुसरी जागा कॉंग्रेसला देण्याची त्यांची तयारी आहे. त्याबदल्यात गोव्‍यातील दोन्ही जागा कॉंग्रेसला आपकडून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारी जाहीर केली, तरी ती मागे घेतली जाऊ शकते.

व्हिएगस यांची दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून घोषणा करत प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसची जबरदस्त कोंडी केली असे चित्र निर्माण झाले असले, तरी ते फसवे आहे, अशी माहिती ‘आप’च्या ज्येष्ठ नेत्याने मंगळवारी दै. ‘गोमन्तक’ला दिली. सध्या या मतदारसंघातून

काँग्रेसचे फ्रान्सिस सार्दिन हे खासदार आहेत. दक्षिण गोव्यातून सार्दिन यांना पुन्हा उमेदवारी देणार की नाही हे कॉंग्रेसने ठरवण्याआधीच ‘आप’ने तेथे उमेदवार ठरवून कॉंग्रेसला जागा वाटप चर्चेला येण्यास भाग पाडले आहे. पंजाब आणि दिल्लीतील जागांच्या बदल्यात कॉंग्रेसला गोव्याच्या जागा मिळू शकणार असल्याने कॉंग्रेसला उमेदवारीबाबत निर्णय घेण्यास अवकाश निर्माण होणार आहे, असे ‘आप’चा नेता म्हणाला.

काँग्रेसने उत्तर व दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुकांकडून अर्ज मागवले होते. त्या अर्जांवर विचार करण्यासाठी ती नावे पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आली आहेत. त्या नावावर विचार होण्याआधीच ‘आप’ने एक पाऊल पुढे टाकले आहे. दक्षिण गोव्यासाठी ख्रिस्ती चेहरा म्हणून कॅप्टन व्हेरियातो फर्नांडिस आणि हिंदू चेहरा म्हणून काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य गिरीश चोडणकर यांच्या नावाचा विचार काँग्रेसने चालवला आहे, परंतु स्थानिक काँग्रेस पक्ष मात्र फ्रान्सिस सार्दिन यांच्या नावाचा आग्रह धरत आहे.

मुख्यमंत्र्यांना आनंदाच्या उकळ्या:

एल्टन : ‘आप’ने दक्षिण गोव्यात आपला उमेदवार जाहीर केल्यावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना आनंदाच्या उकळ्या फुटणे साहजिकच आहे, अशी प्रतिक्रिया केपेचे काँग्रेस आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी व्यक्त केली आहे. दक्षिण गोव्यात काँग्रेस पक्षाची ताकद काय ते मुख्यमंत्र्यांना माहीत आहे आणि या मतदारसंघातील स्वतःची कमजोरीही माहीत आहे. अशा स्थितीत ‘आप’ मैदानात उतरल्यास काँग्रेसची मते फुटून त्याचा फायदा भाजपला होईल, यामुळेच त्यांना आनंद झाला असेल, असे डिकॉस्टा यांनी म्हटले आहे.

‘इंडिया’ आघाडी संपल्यातच जमा: मुख्यमंत्री

‘इंडिया’ आघाडीतील एक एक पक्ष सोडून जात आहे. कॉंग्रेस पक्षावर कोणाचाच विश्र्वास नाही. गोव्यात दक्षिण गोव्यात आम आदमी पक्षाने बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांची लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण गोवा मतदारसंघात उमेदवारी जाहीर केल्याने आता ‘इंडिया’ युती संपल्यातच जमा आहे हे स्पष्ट झाले आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

‘आप’ भाजपची बी टीम

‘आप’ने दक्षिण गोव्यात आपला उमेदवार जाहीर केला, तरी या मतदारसंघात काँग्रेसच्या विजयास कोणताही अडथळा येणार नाही. ‘आप’ने नेहमीच भाजपची बी टीम म्हणून काम केले आहे. मात्र, दक्षिण गोवा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. तो कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे फ्रान्सिस सार्दिन म्हणाले.

‘काँग्रेसने दोन्ही जागा लढवाव्या’

दिल्लीत ‘इंडिया’आघाडीची विविध पक्षांशी चाललेली चर्चा फिसकटली तरी गोव्यापुरती तरी आपली युती असावी व काँग्रेस पक्षाने या दोन्ही जागा लढवाव्यात यावर आमची चर्चा झाली आहे. त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांच्या संपर्कात आहेत, अशी माहिती ‘आप’च्या एका ज्येष्ठ नेत्याने मंगळवारी दै. ‘गोमन्तक’ला दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT