गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत 15 फेब्रुवारीला त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी मंत्र्यांसह अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनासाठी जाणार आहेत. गोवा मंत्रिमंडळातील सर्व सदस्य महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल होतील.
गोव्यापूर्वी उत्तर प्रदेश मंत्रिमंडळातील सदस्यांनी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाचे दर्शन घेतले होते. यानंतर आता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मंत्रिमंडळ रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाणार आहे.
अलीकडेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या कुटुंबासह अयोध्येत भगवान श्रीरामाचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि त्यांची पत्नीही दर्शनासाठी अयोध्येत दाखल झाले होते.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी (13 फेब्रुवारी) उत्तर गोवा जिल्ह्यातील थिवी रेल्वे स्थानकावरून आस्था या स्पेशल ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. सुमारे 2000 भाविकांना घेऊन उत्तर प्रदेशातील अयोध्येला रवाना करण्यात आली.
अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर रामलल्लाच्या दर्शनासाठी देश आणि जगभरातून रामभक्त दररोज मोठ्या संख्येने जात आहेत.
भाविकांसाठी देशातील विविध शहरांतून आस्था स्पेशल ट्रेनही चालवण्यात येत आहेत. भारतीय रेल्वेने दिल्ली, हरिद्वार आणि इतर अनेक शहरांमधून अयोध्येसाठी आस्था स्पेशल ट्रेन चालवण्याची योजना आखली आहे. गोव्यातून देखील आस्था स्पेशल ट्रेनही सुरू करण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.