Noise Pollution Control Committee
Noise Pollution Control Committee Dainik Gomantak
गोवा

Goa Noise Pollution: ध्‍वनी नियम मोडणारे सुरक्षित,अन् आवाज उठवणाऱ्यांवर कारवाई

दैनिक गोमन्तक

Morjim Gawdewadi: ध्‍वनी प्रदूषणाविरोधात लढा देणे ही चांगली बाब असताना काही जणांना त्‍याचा मोठा त्रास झाला आहे. सात वर्षांपूर्वी मोरजी-गावडेवाडा किनारी भागात मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारी होत्‍या. त्यानुसार सरकारला निवेदन सादर करण्यात आले होते. तरीही कोणतीही कारवाई न झाल्‍याने काही नागरिकांनी शांततेच्‍या मार्गाने निदर्शने केली होती. मात्र, तेव्‍हा पोलिसांकडून ‘त्‍या’ आंदोलन करणाऱ्या ध्‍वनी प्रदूषण (Noise Pollution) समितीवर गुन्‍हे दाखल करण्‍यात आले होते. आजही केस सुरू आहे.

मांद्रे मतदारसंघातील किनारी भागातील होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाविरोधात आवाज उठवणाऱ्या नागरिक, वकील, पत्रकार यांची कोंडी झाली आहे. सरकारने या प्रश्‍‍नी हस्‍तक्षेप करावा, अशी मागणी होत आहे.

सविस्तर माहितीनुसार, मागच्या सात वर्षांपूर्वी मोरजी-गावडेवाडी (Morjim Gawdewadi) किनारी भागात मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण होत असल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी होत्या. सलग आठ दिवस अशा पार्ट्या बेकायदा सुरू असल्याचे लेखी निवेदन ध्वनीप्रदूषण नियंत्रण समितीचे (Noise Pollution Control Committee) प्रसाद शहापूरकर, निवृत्ती शिरोडकर या सदस्यांबरोबरच इतर नागरिकांनी उत्तर गोवा जिल्हाधिकारी, उत्तर गोवा पोलीस अधीक्षक, पेडणे उपजिल्हाधिकारी आणि पेडणे पोलीस यांना सादर केले होते.

त्‍यानंतर त्याच दिवशी सायंकाळी परवाना नसतानाही संगीत पार्टीचे आयोजन केले होते. त्याचा लोकांना त्रास होत असल्याने सरकारच्या निषेधार्थ काही नागरिकांनी निदर्शने करण्याचा ऐनवेळी निर्णय घेतला आणि त्यानुसार शांततेत रस्त्याच्या बाजूला थांबून निदर्शने केली.

* मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी अमली पदार्थ विरोधात जी मोहीम उघडलेली आहे, ती कौतुकास्पद आहे. त्याच पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी ध्‍वनी प्रदूषणाविरोधात पावले उचलावीत.

* किनारी भागांत होणाऱ्या पार्ट्यांमधून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा व्यवहार चालतो. त्यातूनच मग खून, बलात्कार यासारखे प्रकार घडून गोव्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी होत आहे.

* ध्वनी प्रदूषणाच्या विरोधात आवाज उठवतात त्यांनाच न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागत आहे. मात्र, जे ध्वनीप्रदूषण करतात त्यांच्याविरोधात तक्रार नोंद करण्याची धमक पोलीस दाखवत नाहीत.

ज्यांनी ध्वनीप्रदूषण केले, त्याच्या विरोधात मात्र अजूनही एकही गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही. मात्र जे नागरिक लोकांच्या हितासाठी आणि शांततेचा भंग होत असल्यामुळे ध्वनी प्रदूषण थांबावे यासाठी रस्त्यावर उतरतात, त्यांच्यावर मात्र विनाकारण गुन्हे नोंद करण्याची प्रक्रिया ही अयोग्‍य असल्याचे पेडणे स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष आणि पार्सेचे माजी सरपंच देवेंद्र प्रभुदेसाई, प्रसाद शहापूरकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: खलपांनी 3.50 लाख गोमन्तकीयांना लुटले, विरियातोंची उमेदवार म्हणून लायकी नाही; सांकवाळमध्ये सावंत, तानावडे बरसले

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

SCROLL FOR NEXT