NEET Exam 2022 : अखिल भारतीय स्तरावरील ‘नीट-युजी 2022’च्या प्रवेश परीक्षेत गोव्यातून आकाश बायजूजची विद्यार्थिनी अनुष्का कुलकर्णी हिने 24वा क्रमांक पटकावून नेत्रदीपक यश मिळविले. आता दिल्लीतील ‘एम्स’मध्ये प्रवेश घेऊन डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला असून भविष्यात न्यूरोसर्जन होण्याचे तिचे स्वप्न आहे. या परीक्षेत तिला 720 पैकी 705 गुण मिळाले. दरम्यान, आकाश-बायजूजचे तीन विद्यार्थी अखिल भारतीय स्तरावर पहिल्या एक हजार विद्यार्थ्यांमध्ये आले आहेत.
आकाश बायजूज शिक्षण संस्थेतर्फे अनुष्का कुलकर्णी हिचे अभिनंदन करण्यात आल्यानंतर बोलताना ती म्हणाली की, अकरावीतच असताना डॉक्टर बनण्याचा आपण निश्चय केला होता. त्यासाठी देशातील सर्वोत्तम अशा वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे मनाशी ठरवून आकाश-बायजूजच्या शिक्षकांच्या मदतीने अभ्यास केला त्यात यश मिळविले. मी धेंपो महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून अखिल भारतीय स्तरावर 50 मध्ये येण्याची खात्री होती. दरम्यान, आकाश-बायजूजचे साहाय्यक संचालक हर्षद हरुण म्हणाले की, अनुष्का कुलकर्णीच्या या यशाबद्दल तिचे अभिनंदन. आमच्यासाठी हा अभिमानाचा क्षण तर इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा क्षण आहे.
चुका ओळखून त्या सुधारल्या
अकरावीत असताना मला गणितापेक्षा जीवशास्त्रमध्ये अधिक रुची होती. आकाश-बायजूजच्या सराव चाचण्यांमध्ये सुरुवातीला 500च्या आसपास गुण मिळत होते. मात्र कोठे चुका होत आहेत हे ओळखून परीक्षेसाठीची तयारीच्या पद्धतीत बदल केला व त्याचे विश्लेषण करून त्या दिशेने तयारी सुरू केल्यावर मला 700च्या वर गुण मिळण्यास सुरुवात झाली. या यशामध्ये आकाश बायजूजच्या चाचणी साखळीचा मोठा वाटा आहे.
नीट परीक्षेच्या आधी मी काही आठवडे आधी दररोज एक सराव चाचणी देत होती. त्याचा मला खूपच फायदा झाला. कोविड काळात ऑनलाईन वर्ग सुरू असले तरी या संस्थेतील शिक्षक कोणत्याही क्षणी शंका निरासन करण्यास उपलब्ध असायचे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट समजण्यास अधिक मदत झाली अशी प्रतिक्रिया अनुष्का कुलकर्णी हिने व्यक्त केली.
अन्य विद्यार्थ्यांचेही घवघवीत यश
आकाश-बायजूज या संस्थेची ओजस्वी फळदेसाई (क्रमांक 480) व आर्य प्रभुगावकर (क्रमांक 518) यांच्यासह श्रेया रामचंदानी (6078), वेदांत माजिक (3306), अर्णव बांदोडकर (14091) यांनीही परीक्षेत यश मिळविले आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे आकाश-बायजूजचे साहाय्यक संचालक हर्षद हरुण यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी संस्थेचे मडगाव येथील शाखा प्रमुख इम्रान खान व पणजी शाखेच्या प्रमुख काजल अरोरा उपस्थित होत्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.