Kashinath Shetye Dainik Gomantak
गोवा

Kashinath Shetye: बेकायदा केबल हटवणाऱ्यालाच हटवले, काशिनाथ शेट्ये यांचे छाटले सावंत सरकारने पंख; तडकाफडकी काढला आदेश

Government Action Against Nodal Officer Kashinath Shetye: शेट्ये यांच्याकडे नोडल अधिकारी म्हणून पदभार दिल्यानंतर त्यांनी धडक कारवाईला सुरवात केली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Nodal Officer Kashinath Shetye Removed Amid Action on Electricity Misuse in Goa

पणजी: वीज खात्याच्या मालमत्तांचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात कायदेशीर मार्गाने धडक कारवाई सुरू केलेले नोडल अधिकारी तथा कार्यकारी अभियंता काशिनाथ शेट्ये यांना मंगळवारी (25 फेब्रुवारी) संध्याकाळी सरकारने आदेश काढून तडकाफडकी या कारवाईच्या जबाबदारीतून बाजूला केले. त्‍यामुळे आश्‍चर्य व्‍यक्त केले जात आहे. काशिनाथ शेट्ये यांच्‍या जागी उत्तर गोव्यासाठी अधीक्षक अभियंता (एसई) शैलेश बुर्ये तर दक्षिण गोव्यासाठी अधीक्षक अभियंता (एसई) राजीव सामंत यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्तीचा आदेश खात्याने जारी केला आहे.

ऑप्टिकल फायबर, टेलिकॉम, इंटरनेट, टीव्ही केबल्सद्वारे वीजखांबांचा गैरवापर होत होता. शेट्ये यांच्याकडे नोडल अधिकारी म्हणून पदभार दिल्यानंतर त्यांनी धडक कारवाईला सुरवात केली होती. या कारवाईत काही नामांकित कंपन्यांचा समावेश असल्याने त्यांच्याकडून शुल्कापोटी कोट्यवधींची थकबाकी वसूल करण्याचे काम शेट्ये यांनी हाती घेतले होते. त्यातूनच त्यांनी संबंधित कंपन्यांना कायदेशीर नोटिसा बजावल्या होत्या.

या कारवाईविरोधात टीव्ही व इंटरनेट (Internet) सेवा पुरवठादारांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मात्र या कारवाईस अंतरिम स्थगिती देण्यास नकार देण्यात आला होता. त्यामुळे आजपासून शेट्ये यांनी पणजीत केबल्‍स हटविण्‍याची धडकपणे कारवाई सुरू केल्यावर त्याचा फटका काही सरकारी तसेच अनेक खासगी आस्थापनांना बसला. दुसरीकडे, या कारवाईमुळे मंत्री व आमदारांवर दबाव वाढल्याने त्याची परिणती म्हणून अखेर वीज खात्याला हस्तक्षेप करून शेट्ये यांच्‍याकडे दिलेली जबाबदारी मागे घेण्यास भाग पडले. काही केबल्सधारकांनी दिलेली ‘ऑफर’ शेट्ये यांनी झिडकारून लावल्‍याचे समजते. याबाबत त्‍यांनी सांगितले की, मला दिलेली जबाबदारी मागे घेण्याचा हा सरकारचा निर्णय आहे. आता इतर कामांना वेळ व मोकळीक मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT