Sanjivani Sugar Factory Dainik Gomantak
गोवा

Sanjivani Sugar Factory:... तर ‘संजीवनी’च्या जागेत प्रकल्प नको!

Sanjivani Sugar Factory: ऊस उत्पादक आक्रमक : इथेनॉलसंबंधी भूमिका 15 दिवसांत स्पष्ट करा

दैनिक गोमन्तक

Sanjivani Sugar Factory: पुढील पंधरा दिवसात सरकार इथेनॉल संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा आम्ही ‘संजीवनी’च्या जागेत कोणताही प्रकल्प होऊ देणार नाही, असा इशारा ऊस उत्पादक समितीचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला. यावेळी त्याच्यासोबत हर्षल प्रभुदेसाई,दयानंद फळदेसाई,फ्रांसिस मास्कारेन्हास,गुरुदास गाड व समितीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

उस उत्पादकांची उस तोडणी सध्या सुरू आहे, पुढे ऊस लावावा की नाही, या संदर्भात ऊस उत्पादक शेतकरी आम्हाला विचारणा करत आहेत.सरकारने जेव्हा आम्हाला इथेनॉल संदर्भात तुम्ही कंत्राटदार शोधावा, असे सांगितले होते, त्यानुसार आम्ही कंत्राटदारासहीत मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांची भेट घेतली. त्यावेळी आमच्या सोबत मंत्री सुभाष फळदेसाई हेही उपस्थित होते.

मुख्यमंत्री सावंत यांची भेट घेऊन आज अनेक दिवस उलटले पण सरकारने अजूनही इथेनॉलसंदर्भात धोरण स्पष्ट केलेले नाही.येत्या पंधरा दिवसात सरकारने इथेनॉल संदर्भात आपले धोरण स्पष्ट करावे, अन्यथा आम्ही आंदोलन उभारू असेही ऊस उत्पादक राजेंद्र देसाई यांनी सांगितले.

ऊस पिकवावा की नको ?

संपूर्ण गोव्यात या कारखान्यात सध्या 600 उस उत्पादक कार्यरत आहेत. या सर्वांच्या शेतातील उसाची तोडणी येत्या काही दिवसांत होणार आहे. पुढे ऊस पिकवायचा की नाही, हे तरी समजायला पाहिजे, यासाठी सरकारने आपले धोरण स्पष्ट करणे गरजेचे आहे,असे मत फ्रांसिस मास्कारेन्हास यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

IFFI मध्ये Goan Director's Cut चे आकर्षण! सगळ्या गोमंतकीय सिनेमांची माहिती घ्या एका क्लिकमध्ये

Goa Today's News Live: 'कॅश फॉर जॉब प्रकरण'; काँग्रेस युथ पदाधिकाऱ्यांची म्हार्दोळ पोलिस स्थानकावर धडक!

Nagarjuna At IFFI 2024: नागार्जुन यांचा इफ्फीत जलवा! दाखवली नृत्याची झलक; स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाबाबत म्हणाले की..

SCROLL FOR NEXT