Bainguinim Project  Dainik Gomantak
गोवा

Bainguinim Waste Plant: "कचरा प्रकल्पाला विरोध नाही; लोकांच्या भावनांचा विचार करूनच सरकार निर्णय घेईल" भाऊंचे आश्वासन

Shripad Naik Goa: उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी बांयगणीमधील कचरा प्रक्रिया प्रकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त केली

Akshata Chhatre

पणजी: उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी बांयगणीमधील कचरा प्रक्रिया प्रकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त केली. ओल्ड गोवा हे पर्यटनाच्या दृष्ट्टीने महत्वाचं केंद्र असल्याने शक्यतो हा प्रकल्प तिथे उभा राहू नये. ते म्हणालेत कि मी स्वतः सरकारचा भाग आहे, त्यामुळे लोकांच्या हितार्थ निर्णय घेतला जावा म्हणून ते नक्कीच संबंधीत मंत्र्यांशी चर्चा करतील. लोकांच्या भावनांचा विचार करूनच सरकार निर्णय घेईल असं त्यांनी सांगितलं.

गोव्यातील भाजप मुख्यालयाच्या बाहेर पत्रकारांशी संवाद साधताना उत्तर गोव्याचे खासदार, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी गोव्यातील विविध घडामोडींवर चर्चा केली. सध्या गोवा पोलिसांचे नाव गैरप्रकारांमध्ये आढळून येत आहे आणि काही जणांच्या अशा वागणुकीमुळे फक्त पोलिस दलाच्या प्रतिष्ठेलाच धक्का बसत नाही, तर सरकार आणि संपूर्ण राज्याचेही नुकसान होत असल्याचे त्यांचे मत आहे.

गोव्यातील जमीन हडप प्रकरणातील कुख्यात गुन्हेगार सुलेमान उर्फ सिद्दीकी खानने अलीकडील पोलिसांवर आरोप केले आहेत. त्याने दावा केला आहे की पोलिस अधिकाऱ्यांनी त्याला बंदुकीच्या जोरावर व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास भाग पाडले. केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना संबंधित प्रश्न विचारला असता त्यांनी नोकरी घोटाळा आणि जमीन हडप प्रकरणांची चौकशी अद्याप सुरू असल्याची पुष्टी केली.

गोव्यात सध्या पर्यटनावरून देखील अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावर बोलताना श्रीपाद नाईक यांनी गोवा सरकार सध्या वाढणारे गुन्हे रोखण्यासाठी संपूर्ण मेहनत घेत असल्याचं सांगितलं.

मागच्या काही वर्षांच्या तुलनेत सध्या गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत असली तरीही सरकार वाढणाऱ्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यात उत्तम कामगिरी बजावत असल्याची माहिती त्यांनी दिली. गोव्यात पर्यटकांसोबत घडणारे गुन्हे हे नक्कीच दुर्दैवी आहेत मात्र सरकार आणि पोलीस त्यांच्यापरीने पुरेपूर मेहनत घेत असल्याचं नाईक म्हणाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT