Sameer Panditrao
कुंभारजुवे मतदारसंघातील विविध पंचायत क्षेत्रातील पंचांनी बायंगिणी येथे प्रस्तावित कचरा प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला आहे.
प्रकल्प लादल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक पंचांनी दिला आहे. मागच्या दाराने प्रकल्प आणण्याचा प्रयत्न थांबवण्याची मागणी.
2006 पासून या प्रकल्पाला विरोध होत आहे. जनसुनावणीत 90% लोकांनी विरोध केला होता, तरीही प्रकल्प पुढे का?
सरकारने प्रकल्प त्वरित रद्द करावा. जनमताचा आदर करत प्रकल्प इतर ठिकाणी हलवण्याची विनंती.
कदंब पठारावरील जागेत रहिवासी संकुले बांधण्याची परवानगी देण्यात आली होती. मग प्रकल्पासाठी जागा का निवडली?
जुने गोवे पंचायत सभागृहात आज स्थानिकांनी आपली बाजू मांडत पत्रकार परिषद घेतली.
2006 पासून प्रकल्पाला स्थानिकांकडून विरोध. त्याआधीच योग्य निर्णय घेतला गेला असता, तर वाद टाळता आला असता.