CM Pramod sawant Dainik Gomantak
गोवा

कोणाचीही गय नाही! रामा काणकोणकर मारहाण प्रकरणाच्या मुळाशी जाणार; मुख्यमंत्री सावंतांचे आश्वासन

Rama Kankonkar assault case: डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, गोव्यातील गुन्हे उकल प्रमाण देशात सर्वाधिक म्हणजे ९२ टक्क्यांहून अधिक आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: रामा काणकोणकर मारहाण प्रकरणाच्या मुळापर्यंत पोलिस जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी (२२ सप्टेंबर) पर्वरी येथे मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना दिली.

यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. त्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, गोव्यातील गुन्हे उकल प्रमाण देशात सर्वाधिक म्हणजे ९२ टक्क्यांहून अधिक आहे. गुन्ह्यात सहभागी असलेल्या कोणालाही कायद्याच्या कचाट्यातून सुटका नाही. गृहमंत्रालय आणि गोवा पोलिस दल सातत्याने दक्षतेने काम करत आहेत.

रामा काणकोणकर मारहाणप्रकरणी आतापर्यंत सात ते आठ जणांना अटक करण्यात आली असून, अशा घटना सहन केल्या जाणार नाहीत. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी केली जाईल, मुख्यमंत्र्यांनी गोवा पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत समाधान व्यक्त केले.

ते म्हणाले, गुन्हा घडताच त्वरित कारवाई, चौकशीला गती आणि दोषींना पकडण्यात पोलिस दलाने देशपातळीवर आदर्श निर्माण केला आहे. गुन्हेगारीला कधीच प्रोत्साहन दिले जाणार नाही. कोणताही राजकीय किंवा सामाजिक दबाव न मानता गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT