Mandrem News Dainik Gomantak
गोवा

Mandrem News: ‘ना हरकत’ दिलेलाच नाही; मांद्रे सरपंचांचा दावा

ती इमारत आपत्कालीन सेवेसाठीची

Kavya Powar

Mandrem News: मांद्रे पंचायतीचा पोलिस स्थानकाला विरोध नाही. परंतु ती इमारत आपत्कालीन सेवेसाठी उभारली गेली आहे. त्यामुळे ही जागा सध्या आमच्या ताब्यात असून आम्ही अजूनपर्यंत ना हरकत दाखला दिलेला नाही किंवा सरकारने पंचायतीशी कसल्याच प्रकारचा पत्रव्यवहार केलेला नाही.

जर सरकारने पत्रव्यवहार केला असेल तर आपण पंचायत मंडळाच्या बैठकीत हा विषय ठेवणार असल्याची माहिती सरपंच ॲड. अमित सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मांद्रे मतदारसंघात खास स्वतंत्र नवीन पोलिस स्थानकाची इमारत जुनस वाडा येथील आपत्कालीन इमारतीमध्ये कार्यान्वित होणार आहे. या इमारतीचा ताबा सध्या मांद्रे पंचायतीकडे आहे. या इमारतीत पोलिस स्थानक सुरू करण्यास मांद्रे पंचायतीने किंवा सरपंचांनी ना हरकत दाखला दिला आहे का? असा सवाल मांद्रे पंचायत मंडळाच्या शनिवारच्या खास बैठकीत पंचसदस्यांनी उपस्थित केला.

जर परवाना दिला नसेल तर तशी माहिती प्रसारमाध्यमांना तुम्ही द्या, अशी आग्रहाची भूमिका पंचमंडळाने सरपंच ॲड. अमित सावंत यांच्याकडे केली. त्यानुसार सरपंच सावंत यांनी शनिवार, ३० रोजी सायंकाळी पंचायत कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी व्यासपीठावर पंचसदस्य महेश कोनाडकर, पंच संपदा आजगावकर, पंच मिंगेल फर्नांडिस आदी उपस्थित होते.

याबाबत आम्ही अनभिज्ञच

ॲड. अमित सावंत यांनी सांगितले की, या इमारतीमध्ये पोलिस स्थानक होणार हे आम्हाला माहिती नव्हते. आपण किंवा पंचायतीने कसल्याच प्रकारचे कुणाला ना हरकत दाखले दिलेले नाहीत. या पोलिस स्थानकासाठी आपला विरोध नाही. परंतु सरकारने आजपर्यंत पंचायतीकडे या इमारतीसंबंधी कसलाच पत्रव्यवहार केलेला नाही.

खास बैठकीत काही पंचसदस्यांनी आपल्याला पोलिस स्थानकासाठी इमारतीचा ताबा तुम्ही सरकारकडे दिला आहे का किंवा ना हरकत दाखला दिला आहे का, असा प्रश्न केल्यानंतर आपण त्यांना नाही, असे उत्तर दिले. त्यानंतर एकूण दहाही पंचसदस्यांनी या इमारतीमध्ये पोलिस स्थानक कार्यान्वित करण्यासाठी हरकत असल्याचा ठराव घेतलेला आहे. - ॲड. अमित सावंत, सरपंच

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT