Goa Liquor  Canava
गोवा

Goa News: विद्यालये आणि धार्मिक स्थळांपाशी मद्यविक्री परवाने हवेत कशाला? मद्यविक्रेता संघटनेचा सरकारला घरचा आहेर

Liquor And Bars In Goa: शंभऱ मीटर परिघात परवाने नसले म्हणून पर्यटकांसह कोणाचे काही अडणार नाही

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यातील विद्यालये आणि धार्मिक स्थळांपासून १०० मीटर परिघात मद्यविक्रीचे परवाने हवेच कशाला? अशी विचारणा करून मद्यविक्रेता संघटनेने सरकारला घरचा आहेर दिला आहे. या संघटनेचे अध्यक्ष दत्तप्रसाद नाईक यांनी सांगितले, की राज्यभरात सुमारे साडेतीन हजार ठिकाणी मद्य विक्री होते त्यामुळे शंभऱ मीटर परिघात परवाने नसले म्हणून पर्यटकांसह कोणाचे काही अडणार नाही.

ते म्हणाले, ही तरतूद जुनी असली तरी शुल्कवाढीच्या निमित्ताने पुढे आली आहे. शुल्कवाढ तरी का केली गेली हे स्पष्ट होत नाही. शंभर मीटर परीघात मद्यविक्री नको तर सरकार तसे धोरणात्मक निर्णय घेऊ शकते. अबकारी नियमांत दुरुस्ती हा दुसरा मार्ग सरकारकडे आहे. मात्र सरकारच्या या कृतीमुळे राज्यातील मद्य विक्रेत्यांना शंभर मीटर परिघात परवाने हवे असे जे चित्र तयार झाले आहे चुकीचे आहे. आम्हाला धार्मिक स्थळे व शाळांच्या परिसरात मद्य विक्री करायची नाही. जे पूर्वीचे परवाने आहेत ते सुरू आहेत.

यापूर्वी नाईक यांनी सरकारने किमान तीन वर्षे मद्य विक्री परवाने देण्यावर बंदी घालावी अशी मागणी केली होती. नाईक यांच्या म्हणण्यानुसार मुळात १०० मीटर परिघात परवाने का दिले पाहिजेत. आम्ही अशा गोष्टींचे समर्थन करत नाही. त्या भागात मद्य विक्रीचे परवाने दिल्याने पर्यटनाला चालना कशी मिळेल हे सारी अनाकलनीय आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT