goa Dainik Gomantak
गोवा

Tiswadi News : नव्या ट्रान्सफॉर्मरसाठी निधी नाही; गोवा वेल्हा पंचायतीची स्थिती

Tiswadi News : सभागृह, दुकाने, लिफ्ट विनावापर पडून; कारण त्यांचा ताण घेण्यासाठी पंचायतीत स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर नाही. नवीन बसवण्यासाठी पंचायतीकडे निधी उपलब्ध नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

Tiswadi News :

तिसवाडी, गोवा वेल्हा (सांतआंद्रे) पंचायतीची ट्रान्सफॉर्मर अभावी कोंडी झाली आहे. नवीन पंचायत घराचे उद्‍घाटन होऊन सहा महिने उलटले तरी अजूनही बहुउद्देशीय सभागृह, दुकाने आणि लिफ्ट विनावापर पडून आहेत.

कारण त्यांचा ताण घेण्यासाठी पंचायतीत स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर नाही. नवीन बसवण्यासाठी पंचायतीकडे निधी उपलब्ध नाही.

२७ नोव्हेंबर २०२३ रोजी गोवा वेल्हा पंचायतीचे उद्‍घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले होते. जून महिना उजाडला तरी सभागृह, दुकाने आणि लिफ्ट विनावापर पडून असून पंचायतीला आर्थिक तोटा होत आहे. सुमारे ३.५ कोटी रुपये खर्च करून पंचायत घर बांधण्यात आले होते, तेव्हा याचा लाभ गोवा वेल्हा गोवाला होणार, असा दावा करण्यात आला होता.

परंतु तसे काहीही झाले नाही, कारण सभागृह, दुकाने आणि लिफ्ट यांच्या विजेचा ताण घेण्यासाठी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर नाही. नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी वीज खात्याने ४३ लाखांचा खर्च सांगितला आहे, मात्र यासाठी निधी नसल्याने पंचायत सरकारकडून आर्थिक मदतीची मागणी करत आहे.

पंचायत घरासाठी सरकारने मदत जरी केली असली तरी लिफ्टसाठी पंचायतीच्या सुवर्ण जयंती निधी कोषातून खर्च करण्यात आला होता.

मुख्यमंत्र्यांकडे आर्थिक मदतीची मागणी

ट्रान्सफॉर्मरसाठी आम्ही आमदार वीरेश बोरकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ घेऊन पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांच्याकडे गेलो होतो.

त्यानंतर मुख्यमंत्र्यांना आम्ही पत्र लिहून आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे, कारण सहा महिने उलटल्याने पंचायतीला सभागृह आणि दुकानाच्या माध्यमातून महसूल मिळाला असता. निदान आता ही मदत मिळणे आवश्यक आहे, असे आयनो डिसोझा म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao: 'लग्न नको'! मडगावातील मुलगी सापडली कोल्हापूरात; विवाहाच्या तगाद्यामुळे घरातून काढला पळ

Goa Politics: खरी कुजबुज; बिबट्यालाही राहायला फ्लॅट हवा!

Ro Ro Ferryboat: रो-रो फेरीबोटींच्या नावावरून गोंधळ! स्थानिक नद्यांची नावे देता आली नाहीत का? अमित पाटकर यांचा सवाल

Panaji: पणजीतील जिवंत माणसाला दाखवले 'मृत'! वीज खात्याचा भोंगळ कारभार; मंत्री ढवळीकर देणार स्पष्टीकरण

Cuncolim Revolt: 442 वर्षांपूर्वी परकीय सत्तेच्‍या विरोधात कुंकळ्‍ळीच्‍या 16 महानायकांनी दिलेला लढा आशिया खंडातील 'पहिला उठाव'

SCROLL FOR NEXT