Nitin Gadkari Dainik Gomantak
गोवा

Nitin Gadkari: झुआरी पुलावर फिरते रेस्टॉरंट आणि कॅप्सुल लिफ्ट... उद्घाटनप्रसंगी काय म्हणाले नितीन गडकरी...

या सुंदर पुलाचा समावेश जगातील स्टेट ऑफ आर्टमध्ये होईल, असा गडकरींचा विश्वास

Akshay Nirmale

Nitin Gadkari: हा पुल स्टेट ऑफ आर्ट पुल आहे. गोवा किंवा देशच नव्हे तर जगातील स्टेट ऑफ आर्टमध्ये याचे नाव जाईल, इतका सुंदर हा पुल. गोव्याच्या जनतेला आज हा पुल मिळाला आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही ठरवले आहे की, २०२४ संपण्याआधी भारतातील रस्ते अमेरिकेतील रस्त्यांपेक्षा चांगले असतील. आज तसेच रोड बनत आहेत. येणाऱ्या काळात गोव्याचेही इन्फ्रास्ट्रक्चर चांगेल झाले पाहिजे. गोव्यात दोन एअरपोर्ट झालेत. गोवा प्रमोद सावंत यांच्यान नेतृत्वाखाली नंबर एकचे राज्य होईल, यासाठी शुभेच्छा देतो. या पुलाचा आनंद आणि अभिमान गोव्याच्या जनतेला पुढील अनेक वर्षे राहील, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. नवीन झुआरी पुलाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. (New Zuari Bridge Inauguration)

गडकरी म्हणाले, मनोहर पर्रीकर आणि मी या पुलाचे भुमीपूजन केले होते. मांडवी पुलाचा खर्च त्यांनी गोवा सरकार उचलणार असल्याचे सांगितले होते. नंतर भेट झाल्यावर ते म्हणाले राज्याची आर्थिक स्थिती चांगली नाही, पुलासाठी निधी देऊ शकत नाही, तुम्हीच यातून मार्ग काढा. मी अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि ४०० कोटी दिले आणि पुल पुर्ण झाले आणि त्या पुलाच्या उद्घाटनाला पर्रीकर स्वतः उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, आम्ही गंगेवर १३ पुल बांधतोय, ब्रह्मपुत्रेवर ८ पुल बांधतोय तेही नव्या तंत्रज्ञानानुसार. हा झुआरी पुल वांद्रे-वरळी पुलापेक्षाही मोठा आहे. कन्सल्टंट, कंत्राटदार, इंजिनियर यांनी या अनेक अडचणींवर मात करत हा पुल साकारला आहे. या पुलावर फिरते रेस्टॉरंट आणि आर्ट गॅलरी उभारावे असे माझे स्वप्न होते. वांद्र-वरळी पुलावेळीच ते करायचे होते, पण मध्ये आमचे सरकार सत्तेतून गेले. या पुलावेळी त्यासाठी दोनवेळा टेंडर काढले पण कुणी आलेच नाही. त्यामुळे यावर मी स्वतः, मुख्यमंत्री सावंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल आम्ही मिळून मार्ग काढू. ते कसे शक्य करायचे त्यासाठी मी मदत करेन.

कॅप्सुल लिफ्ट, टॉवरवरून गोवा दर्शन...

गडकरी म्हणाले, पुलाचा काँक्रिटचा बेस वरच्या रचनेसाठी योग्य बनवले आहे. कॅप्सुल लिफ्टने पाण्यातून वर जाऊन या रेस्टारंटमध्ये गोवन पदार्थांचा आस्वाद घेता येईल. आर्ट गॅलरी, गोव्याची खाद्यसंस्कृती, सर्व प्रकारची संस्कृती अनुभवता येईल. हे जागतिक पर्यटनाच्या आकर्षणाचे केंद्र होईल. वरच्या टॉवरवरून संपुर्ण गोव्याचे दर्शन होईल, अशी उत्तम व्यवस्था करता येईल. वर्षातून १२०० स्पेशल फ्लाईट्स गोव्यात येतात. त्यामुळे ही आर्ट गॅलरी, हे फिरते रेस्टॉरंट पुर्ण करण्याची जबाबदारी आमची तिघांची आहे. त्यावर आम्ही मार्ग काढू.

गोवा प्रदुषणमुक्त राहील, याची काळजी घ्या...

गोवा सुंदर आहे, पण गोव्याला प्रदुषणमुक्त केले पाहिजे. मी इलेक्ट्रिक वाहने, बायोडिझेलवर चालणारी वाहने आणली आहेत. हायड्रोजनवरील कार आणली आहे. पुढील काळात गोव्यात प्रदुषण होणार नाही याची काळजी घ्या. गोवा सुंदर राहिला पाहिजे.

वनविभागाची परवानगी लवकर मिळवून द्या...

भारतमाला योजनेतील दोन प्रोजेक्टमध्ये गोवा आहे. मुंबई-कन्याकुमारी आणि हैदराबाद-पणजी या मार्गांची कामे अनुक्रमे सहा पदरी आणि चार पदरी होणार आहेत. वन विभागाला तेवढी लवकर परवानगी द्यायला सांगा. तिथे खूप वेळ जातो. केंद्राकडे पाठवा मी तिथून करून घेतो. मुख्य सचिवांची बैठक घेऊन लवकरात लवकर क्लियरन्स द्या. खांडेपार नदीवर तीनशे कोटी खर्चून ७ किलोमीटरच्या चौपदरी पुलाचे बांधकाम केले आहे. रायबंदर येथे तीनशे कोटी खर्चून ८ किलोमीटरच्या चौपदरी बायपासचे काम केले आहे.

रिंग रोड बाबत अभ्यास करून कळवू...

मुंबई-कन्याकुमारी मार्गावरील पत्रादेवी ते बांबोळी या मुंबई-गोवा महामार्गाच्या अखरेच्या टप्प्यातील मार्ग होण्यात काही अडचणी आहेत. काँट्रॅक्टर बदलले, जमिन अधिग्रहणाच्या अडचणी आहेत. सात ते आठ महिन्यात हा प्रकल्प पुर्ण करायचा आहे. पत्रादेवीपासून गोव्याच्या बाहेरून जाणारा रिंगरोड करण्याची विनंती तुम्ही केली आहे. मी आजच त्यावर काही सांगत नाही. पण त्याचा अभ्यास करू. राज्य सरकारने ५० टक्के जमिन अधिग्रहणाचा खर्च द्यावा. (त्यावर मुख्यमंत्र्यांनी हात जोडून शक्य नाही, असे सांगितले.) देणार नाही तर ठीक आहे. पण सरकारी जागा द्या. सिमेंट, स्टीलवरील जीएसटी कमी करा. इतर साहित्यावरील रॉयल्टी फ्री करा. कारण हा रस्ता २० ते २२ हजार कोटींचा होईल. पण राज्य सरकारने तयारी दाखवली तर हा रस्ता करता येईल. हा रस्ता झाला तर बाहेरची वाहतूक बाहेरच्या बाहेर जाईल, शहरातील अपघात कमी होतील. अभ्यास करून याबाबत तुम्हाला कळवू.

पुलाच्या आणि फुलांच्या सौंदर्याचा मिलाफ व्हावा...

गडकरी म्हणाले, मनोहर पर्रीकरांची उणीव आजच्या कार्यक्रमात जाणवत आहे. गोवा सुंदर राज्य आहे. येथे येणारे जात नाहीत. हे देखील अडचणीचे ठरते. गोवा प्रदुषणमुक्त होईल, समुद्र चांगला राहिल, हे पाहिले पाहिजे. या पुलावर काही झाडे लावलेली नाहीत. पण मी नागपुरात म्युझिकल फाऊंटेन बनवले आहे. तिथे ११ मजली इमारत आहे. तिथे ४ हजार लोकांची गॅलरी आहे. ११०० गाड्यांचे पार्किंग आहे. फुड मॉल्स, रेस्टॉरंट आणि मल्टीप्लेक्स आहे. ११ व्या मजल्यावर फिरते रेस्टॉरंट आहे. हा रस्ता विमानतळापर्यंत न्यावा. हा रोड ग्रीन करण्याकरता कोणती झाडे लावली पाहिजेत त्याचा अभ्यास करा. हा ग्रीन रोड तयार झाला तर पुलाचे आणि फुलांचे सौंदर्य यांचा मिलाफ व्हावा. मुख्यमंत्री, वन अधिकाऱ्यांनी त्यावर चांगला प्लॅन करावा. रस्त्याच्या मध्यभागी आणि दोन्ही बाजूला झाडे लावता येतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT