Nitin Gadkari And Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa News: 'गडकरींना महाराष्ट्रापेक्षा गोवा अधिक जवळचा वाटतो, नागपूरनंतर त्यांचं गोव्यावर जास्त प्रेम'; CM सावंत

Goa CM Pramod Sawant On Nitin Gadkari: गोव्याच्या अर्थसंकल्पापेक्षाही अधिक पैसे खर्च करण्याचा विचारही कोणी केला नसेल तो गडकरींनी केला, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

Pramod Yadav

वास्को: "केंद्रीय नितीन गडकरींना महाराष्ट्रापेक्षा गोवा अधिक जवळचा वाटतो, नागपूरनंतर ते गोव्यावर जास्त प्रेम करतात, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले. गडकरींची गोव्याबाबत विचार करण्याची पद्धत वेगळी आहे," असेही मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

कुठ्ठाळी येथे नवीन झुआरी पुलावरील टेहळणी मनोरा (ऑब्झर्व्हेटरी टॉवर्स ॲण्ड व्हिविंग गॅलरीज) प्रकल्पाची पायाभरणी २३ मे रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक तथा महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडली. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते.

"नाविण्यपूर्ण काहीतरी करण्याचा विचार गडकरींच्या मनात येतो तेव्हा त्यांना सर्वात पहिल्यांदा गोवा दिसतो. गडकरी प्रत्येकवेळी नवीन गोष्टी सांगत असतात. गेल्या तीस वर्षापासून राजकारण म्हणून गडकरी गोव्यात येतायेत. गोव्याबाबत त्यांचे प्रेम अधिक असल्याचे दिसून येते," असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

पत्रादेवी ते पोळे, मोले ते दाबोळी, केरीतून बेळगावला जोडणारा रस्ता अशा राष्ट्रीय महामार्गांसाठी २०१४ पासून आत्तापर्यंत ३३ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. गोव्याच्या अर्थसंकल्पापेक्षाही अधिक पैसे खर्च करण्याचा विचारही कोणी केला नसेल तो त्यांनी केला, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

"टेहळणी मनोऱ्यावरुन ३६० अंशात गोव्याचे सौंदर्य पाहता येईल, त्याला कॅप्सुल लिफ्ट असेल, सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा पाहण्यासाठी लोक गुजरातला जातात, आता टॉवर पाहण्यासाठी लोक गोव्यात येतील", असे सावंत म्हणाले.

"टेहळणी मनोऱ्यावर दोन फ्लोअर असतील, यात ओपन रेस्टॉरंट, आर्ट गॅलरी, दोन्ही टॉवरमध्ये ये जा करण्यासाठी वॉक वे, बोट पार्किंग, सीसीटीव्ही आणि सुरक्षेची साधने देखील या ठिकाणी असतील. या प्रकल्पासाठी एकूण २७० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. दिलीप बिल्डकॉन कंपनीकडे या प्रकल्पाची उभारणी आणि ६० वर्षांसाठी देखभाल करण्याची जबाबदारी असेल. यासाठी सरकारच्या तिजोरीवर कोणताच ताण पडणार नाही. ५ वर्षात हा प्रकल्प पूर्ण होईल, असे सांगितले जाते आहे. पण, त्यापूर्वीच हा प्रकल्प पूर्ण होईल," अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, नितीन गडकरी यांनी बोलताना मी ज्या ज्या राज्यात जातो तेथील मुख्यमंत्री असेच म्हणतात की त्यांना हे राज्य जास्त जवळचे आहे. राज्यातील रस्ते चांगले व्हावेत असा माझा आग्रह आहे. रस्ते उत्तम असल्यास वाहतूक चांगली होते त्यामुळे राज्याचा विकास होते, असे गडकरी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT