Nitin Gadkari, Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Projects For Goa: गोव्‍यासाठी 30 हजार कोटींची आर्थिक मदत; गडकरींची ग्वाही

Mopa Link Road Inaugration: नावेली, कुंकळ्ळी, काणकोण ते कर्नाटक सीमेपर्यंत ४५ किलोमीटर लांबीच्या चार ते सहापदरी ‘मडगाव बायपास’ची घोषणा

गोमन्तक डिजिटल टीम

राज्याच्या प्रदूषणमुक्त हरित विकासासाठी सरकारने आराखडा बनविणे अपेक्षित आहे. अन्यथा गोव्याचा ऋषिकेश, हरिद्वार होण्यास वेळ लागणार नाही. राज्याच्या विकासासाठी पुढील पाच वर्षांत ३० हजार कोटींची आर्थिक मदत दिली जाईल, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री गडकरी यांच्या हस्ते आज मोपा विमानतळाच्या लिंक रोडचे उदघाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा, मच्छीमार मंत्री नीळकंठ हळर्णकर आणि मान्यवर उपस्थित होते.

दरड प्रकरणाची चौकशी करू!

मालपे येथे १५ दिवसांत दोनदा दरड कोसळल्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग बंद आहे. या प्रकाराची चौकशी केली जाईल, तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी घटनास्थळाची पाहणी करतील. जर कंत्राटदार दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

नव्या बोरी पुलाला होणारा विरोध दूर करा!

बोरी येथील नव्या पुलाला स्थानिकांकडून होणारा विरोध लक्षात घेऊन मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, ५०० कोटी रुपये खर्चून बोरी येथे नवा प्रस्तावित पूल होणार आहे. नव्या बोरी पुलाला होणाऱ्या विरोधावर मुख्यमंत्र्यांनी स्थानिकांशी चर्चा करून तोडगा काढावा.

टॅक्सी व्यावसायिकांना सवलतीचे पास देऊ!

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, पेडण्यातील टॅक्सी व्यावसायिकांनी या मार्गावरील टोल माफ करण्याची मागणी केली आहे. मंत्री गडकरी यांच्याशी मी याविषयी बोललो. थेट टोल माफ होऊ शकत नाही. मात्र, त्याऐवजी ते आम्हाला सवलत देतील, अशी आशा आहे. टॅक्सी व्यावसायिकांना टोल पास दिले जातील. तशी मागणी मी मंत्री गडकरी यांच्याकडे केली असून ते ती मान्य करतील, असा विश्वासही सावंत यांनी यावेळी व्यक्त केला.

दाबोळी ते वेर्णा जंक्शन फ्लायओव्हर

दाबोळी विमानतळ ते वेर्णा जंक्शनपर्यंत एक हजार ५०० कोटी रुपये खर्चून फ्लायओव्हर बांधण्यात येणार आहे. त्यामुळे मोपाप्रमाणेच दाबोळी विमानतळसुद्धा आवश्‍यक आहे. दाबोळी विमानतळ बंद होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुन्हा दिली.

‘मडगाव बायपास’साठी साडेतीन हजार कोटी

मोपा येथील कार्यक्रमात मंत्री नितीन गडकरी यांनी नावेली, कुंकळ्ळी, काणकोण ते कर्नाटक सीमेपर्यंत ४५ किलोमीटर लांबीच्या चार ते सहापदरी ‘मडगाव बायपास’ची घोषणा केली. या महामार्गासाठी साडेतीन हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa: म्हापसा पालिकेचं सभागृह 'स्वातंत्र्यदिन समूहगीत' स्पर्धेसाठी पडले अपुरे, ढिसाळ नियोजनमुळे शिक्षकांत नाराजी

Mungul Firing Case: कोलव्‍यातील मार्गारिटा हॉटेलचाही हल्ल्याशी संबंध? व्हेन्झी व्‍हिएगस यांचा आरोप, मुंगूल गँगवॉरबाबत कारवाई करण्याची मागणी

Goa Live News: शिवोलीमधील जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या चालू नूतनीकरणाची पाहणी

Quepem: 'त्‍या' भावाने काढले बहिणींचे विवस्‍त्रावस्‍थेतील फोटो! धमकी देऊन करायचा मारहाण; केपे अत्याचार प्रकरणात धक्कादायक गोष्टी उघड

Arjun Tendulkar Engaged: सचिनच्या लेकानं बालपणीच्या मैत्रिणीसोबत उरकला साखरपुडा; कोण आहे तेंडुलकर घराण्याची होणारी सुन?

SCROLL FOR NEXT