Mopa Link Road: धारगळमधून मोपा विमानतळ फक्त पाच मिनिटात, 1200 कोटींच्या लिंक रोडचे गडकरींच्या हस्ते उद्घाटन

New Mopa Link Road: सुमारे सात किलोमीटर लांबीचा असणारा हा नवा अ‍ॅक्सेस नियंत्रित महामार्ग मुंबई- गोवा - कन्याकुमारी महामार्गाला जोडतो.
New Mopa Link Road Inagurated by Nitin Gadkari
New Mopa Link Road Inagurated by Nitin GadkariDainik Gomantak
Published on
Updated on

उत्तर गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारा मोपा लिंक रोडचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उद्घाटन केले. 1200 कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या या लिंक रोडमुळे विमानतळाला जाण्यासाठीचा वेळ कमी होणार आहे. मुंबई- गोवा - कन्याकुमारी महामार्गावरुन विमानतळावर जाण्यासाठी केवळ पाच मिनिटांचा वेळ लागणार आहे.

मोपा लिंक रोडच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उत्तर गोवा खासदार श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, मंत्री माविन गुदिन्हो, आलेक्स सिक्वेरा, नीलकंठ हळर्णकर, दिगंबर कामत, सुदीन ढवळीकर, रोहन खंवटे, प्रवीण आर्लेकर इतर आमदार व मंत्री उपस्थित होते.

सुमारे सात किलोमीटर लांबीचा असणारा हा नवा अ‍ॅक्सेस नियंत्रित महामार्ग मुंबई- गोवा - कन्याकुमारी महामार्गाला जोडतो. सध्या धारगळ ते मोपा विमानतळ हे जवळपास पंधरा किलोमीटर अंतर असून, ते पूर्ण करण्यासाठी वीस ते तीस मिनिटांचा (ट्रफीक नसल्यास) वेळ लागतो. आणि ट्रफीक असल्यास तो वेळ वाढतो. दरम्यान, या नव्या लिंक रोडमुळे हे अंतर पाच ते दहा मिनिटांचा वेळ लागेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

New Mopa Link Road Inagurated by Nitin Gadkari
Actor Gaurav Bakshi Arrested: मुख्यमंत्र्यांनी सांगितले अटक होणारच अन् मंत्र्यांशी हुज्जत घालणारा अभिनेता अटकेत

अध्याधुनिक रोड

नवा अध्याधुनिक लिंक रोडमुळे धारगळमधून मोपा विमानतळ येथे जाण्यासाठी आर्ध्या तासाची बचत होणार आहे. जुना मार्ग केवळ दुपदरी होता मात्र नवा लिंक रोड सहापदरी असून, याचा प्रवाशांना फायदा होणार आहे.

महामार्गामुळे मुंबई- गोवा- कन्याकुमारी महामार्गाला थेट कनेक्शन मिळणार आहे. याशिवाय महाराष्ट्रात देखील जाण्यासाठी याचा फायदा होणार आहे. राज्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी या लिंक रोडचा फायदा होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com