Digambar Kamat Dainik Gomantak
गोवा

Goa Road Projects: गोव्‍यासाठी 7076 कोटींच्‍या रस्त्यांचा प्रस्‍ताव गडकरींना सादर! मंत्री दिगंबर कामत यांची माहिती

Digambar Kamat: ७,०७६ कोटींच्‍या रस्‍ते प्रकल्‍पांचे प्रस्‍ताव सादर केलेले आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्‍याचे (पीडब्‍ल्‍यूडी) मंत्री दिगंबर कामत यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Road Development Proposal : काही दिवसांपूर्वी आपण दिल्लीत केंद्रीय रस्‍ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत, त्‍यांना गोव्‍यासाठी ७,०७६ कोटींच्‍या रस्‍ते प्रकल्‍पांचे प्रस्‍ताव सादर केलेले आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्‍याचे (पीडब्‍ल्‍यूडी) मंत्री दिगंबर कामत यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

आपण काहीच दिवसांपूर्वी दिल्लीचा दौरा करून तेथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आणि त्‍यांना आगामी काळात गोव्‍यासाठी ७,०७६ कोटींच्‍या रस्‍ते प्रकल्‍पांचे प्रस्‍ताव सादर केले. त्‍यातील बहुतांशी प्रस्ताव सविस्तर प्रकल्प अहवालांसह (डीपीआर) सादर करण्यात आले आहेत.

या प्रकल्पांमध्ये बोरी येथील जोडमार्गांसह पूल, गोवा-कर्नाटक सीमेवरील तसेच मोलेतील मार्गाचे चौपदरीकरण, मोले-खांडेपार मार्गाचे चौपदरीकरण, याशिवाय मडगाव, आर्ले येथील महामार्गांच्‍या चौपदरीकरणाचाही समावेश आहे. यातील अनेक कामे पुढील काहीच वर्षांत सुरू होतील, असेही मंत्री कामत यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्‍या नेतृत्‍वाखालील एनडीए सरकार केंद्रात सत्तेवर आल्‍यापासून आणि रस्‍ते आणि महामार्ग मंत्रालयाचा ताबा मंत्री नितीन गडकरी यांच्‍याकडे आल्‍यापासून गोव्‍यात हजारो कोटींच्‍या रस्‍त्‍यांची कामे झालेली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

...तर गोमंतकीयांना 10 लाखांचा आरोग्य विमा; 2027ला सत्तेत आल्यास 'मुख्यमंत्री सेहत' योजने'ची तत्काळ अंमलबजावणी, आतिषी यांची घोषणा

Goa Social Media Ban: मुलांसाठी सोशल मीडिया बंद करण्याची तयारी; गोवा सरकारची घोषणा मोठी, पण अंमलबजावणी सोपी नाही

VIDEO: लाईव्ह सामन्यात कुत्र्याचा धुमाकूळ! चेंडू घेत पळाला अन्... पाहा व्हिडिओ

Ajit Pawar: खासदारकी सोडून महाराष्ट्रात रमले अन् अखेरपर्यंत राज्याचं राजकारण गाजवलं; 'दादा' नावाचं वादळ शांत झालं!

Goa Crime: लोखंडी सळईने मारहाण, शिवीगाळ अन् धमकी; दोन सख्ख्या भावांवर टोळक्याकडून जीवघेणा हल्ला, सांकवाळ हादरलं

SCROLL FOR NEXT